मुंबई - अमेझॉन प्राईम व्हिडिओने आज बहुप्रतीक्षित ऑल-न्यू अमेझॉन ओरिजिनल सिरीज 'ब्रीद: इन टू द शैडोज़' चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. अबुंदंतिया एंटरटेनमेंटची निर्मिती असलेल्या या साइकोलॉजिकल क्राइम थ्रिलर वेबसिरीजद्वारे बॉलीवूड स्टार अभिषेक बच्चन डिजीटल डेब्यू करणार आहे.
या वेबसिरीजमध्ये अभिषेक एका हरवलेल्या मुलीला शोधणाऱ्या अगतिक वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. या वेबसिरिजमध्ये अभिनेता अमित साध हा पुन्हा एकदा वरिष्ठ पोलीस निरीक्षक कबीर सावंतच्या भूमिकेत दिसणार आहे. या दोघांशिवाय साऊथ इंडस्ट्रीतील नावाजलेली अभिनेत्री निथ्या मेननदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच, अभिनेत्री सैयमी खेर हीदेखील एका वेगळ्या भूमिकेत आपल्याला दिसेल.या वेबसिरिजचं दिग्दर्शन मयंक शर्मा याने केलं असून भवानी अय्यर, विक्रम तुली, अरशद सैयद आणि मयंक शर्मा यांनी मिळून ही वेबसिरिज लिहिलेली आहे. भारतासह जगभरातील 200 देश आणि प्रदेशातील सदस्य 'ब्रीद: इन टू द शैडोज़' चे सर्व 12 एपिसोड्स येत्या 10 जुलैपासून पाहू शकतील.