‘अनबिलीव्हेबल’ व ‘कॅसानोवा’ सारखी आंग्ल भाषेतील गाणी गायल्यावर अभिनेता टायगर श्रॉफने आपले पहिले वहिले हिंदी गाणं गायलं आहे. ‘वंदे मातरम’ असे त्या गाण्याचे शीर्षक असून ते भारतीयांच्या देशभक्तीच्या भावनेचा उत्सव आहे आणि देशाच्या संरक्षण दलांना सलाम करते. टायगर श्रॉफने गायलेले हे गाणे विशाल मिश्रा यांनी संगीतबद्ध केले आहे आणि चित्रपट निर्माते-नृत्यदिग्दर्शक आणि चित्रपट-दिग्दर्शक रेमो डिसूझा यांनी दिग्दर्शित केले आहे. कौशल किशोर यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहे. त्यात दिल्लीच्या अमर जवान ज्योतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची दृश्येही आहेत. या गाण्यात टायगर श्रॉफने आपल्या पदलालित्याने चार चांद लावले आहेत.
टाइगर श्रॉफसोबत जॅकी भगनानीने स्वतंत्रता दिवसाच्या निमित्ताने 'वंदे मातरम' हे गाणे प्रत्येक भारतीयाला समर्पित केले असून निर्माता जॅकी भगनानीने ते प्रदर्शित केले. टाइगर श्रॉफसोबत जॅकी भगनानीच्या ‘जे जस्ट म्यूजिक’ ने ‘वंदे मातरम’ रिलीज केले असून यासोबत त्याने हिंदी गाण्यातुन आपला डेब्यू केला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
जॅकी भगनानीने आपल्या सोशल मीडियावर शेयर करत लिहिले, "हे गाणे आपल्या गौरवशाली राष्ट्र आणि त्याच्या लोकांच्या संरक्षण दलांना समर्पित आहे. मोठ्या सन्मानाने आणि अभिमानाने, आम्ही तुम्हाला हे खास समर्पण सादर करतो. -#वंदेमातरम."
गाण्याच्या प्रदर्शनाआधी टाइगर इंस्टाग्रामवर आपले चाहते आणि फॉलोअर्ससोबत चॅट करण्यासाठी लाईव्ह आला होता. या गण्याबाबत बोलताना टाइगर श्रॉफने शेयर केले की, "हे गाणे आपल्या गौरवशाली राष्ट्राला आणि तेथील लोकांना समर्पित आहे. हे घडवण्यासाठी अवर्णनिय प्रवास केला आहे. मोठ्या सन्मानाने आणि अभिमानाने मी तुम्हाला माझे पहिले हिंदी गाणे सादर करतो-#वंदेमातरम. हे माझ्या कायम ह्रदयाच्या जवळचे असेल."
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हे गाणे त्यांच्यासाठी एक उत्तम ट्रिब्यूट आहे ज्यांनी या संकटकाळात गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घेतला होता. जे जस्ट म्यूज़िकने या आधी आलिया भट्ट वर चित्रित केलेले प्रादा, अम्मी विर्क द्वारा गायलेले जाए बे, मुस्कुराएगा इंडिया आणि जुगनी २.० सारखी गाणी प्रचंड गाजली आहेत.
जॅकी भगनानी, टायगर श्रॉफ आणि रेमो डिसूजा यांची ‘वंदे मातरम’ ही परियोजना प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा - अभिनेता प्रकाश राज यांचा अपघात, हैदराबादमध्ये होणार शस्त्रक्रिया