मुंबई : कंगना रणौतचा आगामी रियालिटी शो ‘लॉक अप’ चर्चेत असून, ती १६ जणांना लॉकअप मध्ये टाकणार आहे. जर का शो मधून बाहेर जायचे नसेल तर जेलमधील सेलिब्रिटीजना आपल्या आयुष्यातील एक काळे सत्य सांगावे लागणार आहे. ७२ दिवस चालणाऱ्या या शोचे ‘जेलबर्ड्स’ कोण असणार याबद्दल तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. लॉक अप या भारतातील सर्वात मोठ्या आणि डेअरिंग रिऍलिटी शोची स्ट्रीमिंग तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी कंगना रणौत शहरभरातील सेलिब्रिटींना तिच्या लॉकअपमध्ये ठेवताना दिसत आहे. परंतु अजूनही नावं गुलदस्त्यात असून व्हिडीओजमध्ये त्यांचा चेहरा न दर्शविता पोलिसांकडून अटक करण्यात आल्याचे दाखविले जात आहे.
पहिला 'जेलबर्ड' अभिनेत्रीचा नवरा
पहिली ‘जेलबर्ड’ आहे एक विवाहित अभिनेत्री जिचा नवरा देखील अभिनेता आहे. परंतु दोघांमध्ये सध्या विस्तव जात नाही आणि ते डिव्होर्सच्या मार्गावर आहेत. त्यांना एक लहान मुलगी असून, अभिनेत्रीने प्रेसमध्ये येऊन आपल्या नवऱ्यावर मानसिक छळाचा आरोप केला आहे. तसेच काही आर्थिक व्यवहारांबाबतही त्यांच्यात मतभेद आहेत. ही सदस्य पब्लिसिटी मिळविण्यासाठी परेशान आहे असे म्हटले आहे. ती निशा रावल असावी असा कयास आहे. परंतु काहींच्या मते ती श्वेता तिवारी असण्याची शक्यता आहे. दुसरा ‘जेलबर्ड’ आहे एक विवादित कॉमेडियन. त्याच्या व्हिडीओ मध्ये सांगण्यात आले की त्याच्या वादग्रस्त विधानांमुळे त्याचे स्टॅन्ड अप शोज रद्द केले जात असून, त्याच्यावर केसेस सुद्धा दाखल करण्यात आल्या आहेत. हे कोडे सोप्पे असून तो ’जेलबर्ड’ स्टॅन्ड अप कॉमेडियन मुनावर फारुकी असणार आहे हे निश्चित.
तिसरी जेलबर्ड आहे 'हॉट'
तिसरी ‘जेलबर्ड’ आपल्या ‘हॉट’ अंदाजात कॉफ़ी शॉप मध्ये हॉट कॉफ़ी ऑर्डर करीत असताना तिची अटक करण्यात येते. ती खूप ‘हॉट’ आहे म्हणून. ‘हॉट असणे गुन्हा आहे का?’ असे ती विचारते परंतु तिला ‘लॉक अप’ मध्ये घेऊन जाण्यासाठी अटक केली जाते. ती ‘जेलबर्ड’ पूनम पांडे असण्याची दाट शक्यता आहे. कंगना राणौत १६ लोकप्रिय सेलिब्रिटी स्पर्धकांना तुरुंगात टाकणार आहे. ते सर्वात मूलभूत सुविधांसाठी स्पर्धा करतील जिथे ते विजेतेपदासाठी लढतील. जे त्यांच्याशी प्रथमच संवाद साधू शकतात आणि शोचा एक अनोखा भाग बनू शकतात.
एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित
‘बॅड-ॲस जेल, अत्याचारी खेल’ ही ‘लॉक अप’ या शोची टॅग लाईन असून सेलिब्रिटी स्पर्धकांची लवकरच प्रेक्षकांना ओळख करून दिली जाणार आहे. कंगना रानौत या शो ची सूत्रसंचालक असून अल्ट बालाजी आणि एम एक्स प्लेयर वर हा शो २७ फेब्रुवारीपासून प्रदर्शित होणार आहे.