मुंबई - अभिनेत्री सोनम कपूर आणि दुलकर सलमान यांची जोडी असलेला 'झोया फॅक्टर' हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता या चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात सोनमच्या जन्मापासून ती भारतीय संघासाठी कशाप्रकारे 'लकी चार्म' ठरते हे दाखविण्यात आलं आहे.
प्रत्येकालाच आपल्याकडे काही ना काहीतरी 'लकी चार्म' पाहिजे, अशी इच्छा असते. प्रत्यक्षात जर हे 'लकी चार्म' आपल्याला मिळालं, तर आपलं नशीब बदलायला वेळ लागत नाही. अशाच आशयावर आधारित असलेलं हे गाणं आहे.
हेही वाचा-गणेशोत्सवानिमित्त अमृता खानविलकरचा मराठमोळा श्रृंगार
'झोया फॅक्टर' या चित्रपटातही सोनम कपूर म्हणजे 'झोया' कशाप्रकारे 'लकी चार्म' बनते हे पाहायला मिळणार आहे.
रघुवीर यादव आणि शंकर महादेवन यांनी हे गाणं गायलं आहे. तर, 'शंकर-एहसान- लॉय' यांच्या तिकडीने या गाण्याला संगीत दिलं आहे. अमिताभ भट्टाचार्य यांनी या गाण्याचे बोल लिहले आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
अलिकडेच सोनमने ट्विटर अकाऊंटवर या गाण्याचा टीझर शेअर केला होता. तेव्हापासून या गाण्याची चाहत्यांना आतुरता होती.
हेही वाचा-राणू मंडलबाबत लतादीदींनी दिली प्रतिकिया, म्हणाल्या 'माझी गाणी गात रहा, पण....'
-
Get ready India for the new charm anthem! Lucky charm, dropping tomorrow!@dulQuer #AbhishekSharma @Pooja__Shetty @aartims @foxstarhindi @ad_labsfilms@Imangadbedi @sikandarkher @zeemusiccompany @anujachauhan pic.twitter.com/eizEXsPmQP
— Sonam K Ahuja (@sonamakapoor) September 2, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Get ready India for the new charm anthem! Lucky charm, dropping tomorrow!@dulQuer #AbhishekSharma @Pooja__Shetty @aartims @foxstarhindi @ad_labsfilms@Imangadbedi @sikandarkher @zeemusiccompany @anujachauhan pic.twitter.com/eizEXsPmQP
— Sonam K Ahuja (@sonamakapoor) September 2, 2019Get ready India for the new charm anthem! Lucky charm, dropping tomorrow!@dulQuer #AbhishekSharma @Pooja__Shetty @aartims @foxstarhindi @ad_labsfilms@Imangadbedi @sikandarkher @zeemusiccompany @anujachauhan pic.twitter.com/eizEXsPmQP
— Sonam K Ahuja (@sonamakapoor) September 2, 2019
'झोया फॅक्टर' हा चित्रपट अनुजा चव्हाण यांच्या २००८ साली आलेल्या कादंबरीवर आधारित आहे. सोनम आणि दुलकर शिवाय या चित्रपटात अंगद बेदी देखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
अभिषेक शर्माचं दिग्दर्शन असलेला हा चित्रपट २० सप्टेंबरला प्रदर्शित होईल.
हेही वाचा-आयुष्मान खुराना - नुसरत भरुचाची रोमॅन्टिक केमेस्ट्री, पाहा 'ड्रीमगर्ल'चं नवं गाणं