ETV Bharat / sitara

अभिनेता आशुतोष भाकरेच्या आत्महत्येचे गूढ कायमच.....! - आशुतोष भाकरे आत्महत्या

आशुतोष भाकरे याने गळफास घेवून आत्महत्या केल्यामुळे मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अभिनेत्री मयुरी देशमुखशी त्याचे चार वर्षापूर्वी लग्न झाले होते.

Ashutosh Bhakre's suicide
आशुतोष भाकरेच्या आत्महत्येचे गूढ
author img

By

Published : Jul 30, 2020, 12:38 PM IST

नांदेड: येथील उदयोन्मुख अभिनेता आशुतोष गोविंद भाकरे (वय ३२) याने बुधवारी शहरातील गणेशनगर भागात आपल्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली होती. या घटनेमुळे खळूळ उडाली. आशुतोष हा 'खुलता कळी खुलेना' फेम अभिनेत्री मयुरी देशमुखचा पती होता. दरम्यान, त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.

आशुतोष भाकरे यांचे आईवडील नांदेड येथील प्रख्यात डॉक्टर आहेत. मयुरी देशमुख यांच्यात कोणतेही मतभेद नव्हते, असे त्यांच्या मित्रांनी सांगितले. लॉकडाऊनच्या काळातही हे दोघे एकत्रच होते. सध्या मयुरी नांदेडमध्येच असल्याचे सांगण्यात आले. शहरातील गणेशनगर भागात असलेल्या घरी मयुरी आणि आशुतोषची आई घरात गप्पा मारत बसल्या होत्या, त्यावेळी आशुतोष वरच्या खोलीत होता. बराच वेळ तो खाली आला नाही. त्यामुळे त्याच्या खोलीचा दरवाजा ठोठावण्यात आला. तरीही आतून प्रतिसाद न मिळाल्याने दुसऱ्या बाजूने खोलीत जाऊन पाहिले असता त्यावेळी आशुतोष लटकलेल्या अवस्थेत दिसला.

आशुतोषने काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एक व्हीडीओ शेअर केला होता. या व्हीडीओतील व्यक्ती 'माणूस आत्महत्या का करतो?' याचे विश्लेषण करताना दिसत होती. मात्र आशुतोष इतका टोकाचा निर्णय घेईल , अशी पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती.

गेल्या काही दिवसांपासून तो नैराश्यात होता, असे समजते. त्यामुळे मानसिक तणावातूनच त्याने आत्महत्या केली असावी, असे बोलले जाते. बुधवारी (दि.२९) सकाळी ११ ते १२ च्या सुमारास राहत्या घरी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

' खुलता खळी खुलेना ' या मालिकेतील भूमिकेमुळे मयुरी प्रसिद्धीच्या झोतात आली होती. तिने लिहिलेले व दिग्दर्शित केलेले नाटक ' डीअर आजो'ने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. याशिवाय 'डॉ. प्रकाश बाबा आमटे ३१ दिवस 'अशा काही चित्रपटात ती झळकली आहे. आशुतोषने देखील ' भाकर ' व ' ईचार ठरला पक्का 'या चित्रपटात काम केले आहे. आशुतोष व मयुरी देशमुख २१ जानेवारी २०१६ ला लग्नबंधनात अडकले होते. मयुरी ही सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता पी. वाय. देशमुख यांची मुलगी आहे. २०१७ मध्ये मयुरीने व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने एका वर्तमानपत्रात लिहिलेल्या लेखात आपली लव्हस्टोरी सांगितली होती. आशुतोषच्या आत्महत्येमुळे भाकरे व देशमुख कुटुंबियांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.