ETV Bharat / sitara

‘जीव माझा गुंतला’ मधील ‘रिक्षावाली’ अंतराचा ‘हॉट’ कायापालट! - जीव माझा गुंतला मालिकेत अंतराचा नवा लूक

जीव माझा गुंतला मालिकेत येणार्‍या वेगवेगळ्या घटनांमुळे मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. आता मालिकेत अंतराचा ‘हटके’ आणि ‘हॉट’ अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

रिक्षावाली अंतराचा ‘हॉट’ कायापालट
रिक्षावाली अंतराचा ‘हॉट’ कायापालट
author img

By

Published : Feb 22, 2022, 7:59 PM IST

मुंबई - ‘जीव माझा गुंतला’ मालिकेतील मल्हार आणि अंतरा यांच्यात एकीकडे पराकोटीचा द्वेष आणि दुसरीकडे लग्नासारखे पवित्र बंधन यामध्ये दोघांचीही कसोटी लागत आहे. परस्परविरोधी स्वभावाच्या मल्हार आणि अंतरा यांच्या लग्नानंतर नात्यांचा गुंता अधिकच वाढला. दोघांचेही आयुष्य खूपच बदलले, किंबहुना लग्नबंधनात अडकल्यावर त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली. आता मालिकेत अंतराचा ‘हटके’ आणि ‘हॉट’ अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

जीव माझा गुंतला मालिकेत येणार्‍या वेगवेगळ्या घटनांमुळे मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. अंतरा आणि मल्हारची केमेस्ट्री, त्यांच्यातील नोक झोक कधी त्यांच्यातील अबोला, तर कधी त्यांच्यातील भांडण लोकांना आवडत आहे. खानविलकरांच्या घरी येणार्‍या विशेष पाहुण्यांसाठी मल्हारने अंतराला टास्कच दिला आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ते नाही जमलं तर आईच्या घरी असे देखील तो म्हणाला. त्यामुळे आता अंतरा आता पदर खोचून तयारीला लागली आहे.

रिक्षावाली अंतराचा ‘हॉट’ कायापालट
रिक्षावाली अंतराचा ‘हॉट’ कायापालट

अंतराचे इंग्लिश ऐकून मल्हार थक्क होतो तर दुसरीकडे याआधी कधीही हिल्स न घातल्याने आता ती हिल्स घालून चालण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. मल्हारची साथ मिळतेच आहे पण यामध्ये चित्रा आणि श्वेता काहीतरी कट रचणार हे निश्चित. अंतराचा हटके अंदाज मालिकेत्न बघायला मिळणार आहे. अंतरा वेस्टर्न लुकमध्ये सगळ्यांच्या समोर आल्यावर खासकरून मल्हार सरांची काय रिऍक्शन असेल हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.

रिक्षावाली अंतराचा ‘हॉट’ कायापालट
रिक्षावाली अंतराचा ‘हॉट’ कायापालट
‘जीव माझा गुंतला’ ही मालिका कलर्स मराठीवर प्रसारित होते.

हेही वाचा - Vasantrao Deshpande Biopic : ‘मी वसंतराव’ चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्यासमोर!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.