ETV Bharat / sitara

बिग बॉस मराठी : गायत्रीची खिलाडूवृत्ती आणि सुरेखा कुडचींच्या मनातील खंत! - बिग बॉस मराठी 3

'बिग बॉस'च्या घरात अनेक नवीन नाती तयार होतात. ते कधी प्रेमाचे असते तर कधी मैत्रीचे. या घरात नवनवीन खेळ, डावपेच, टास्क यांची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

बिग बॉस मराठी 3
बिग बॉस मराठी 3
author img

By

Published : Oct 12, 2021, 9:16 PM IST

'बिग बॉस'च्या घरात अनेक नवीन नाती तयार होतात. ते कधी प्रेमाचे असते तर कधी मैत्रीचे. या घरात नवनवीन खेळ, डावपेच, टास्क यांची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रत्येक स्पर्धक मोठ्या कसोशीने खेळत आहे. गायत्री दातार आणि जय दुधाणे या दोघांची छान मैत्री झाली आहे. काही दिवसांपूर्वी दोन टीम तयार करण्यात आल्या. गायत्री आणि जय एकमेकांविरुद्धच्या टीम मध्ये होते. त्यांना दिलेले टास्क दोघांनीही आपली मैत्री कुठेही मध्ये न आणता खिलाडूवृत्ती दाखवत यशस्वीरित्या पूर्ण केले. आता त्यांची मैत्री कुठले रूप धारण करते यामध्ये प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

बिग बॉस मराठी 3
बिग बॉस मराठी 3

बिग बॉस मराठीच्या घरात सदस्यांना काही काही गोष्टी मनाला खूप लागतात, सलत राहतात, जे त्या सगळ्यांपुढे मांडू शकत नाही आणि अशावेळी त्या गोष्टी आपल्या जवळच्या व्यक्तींशी शेअर करतात. सुरेखा कुडची यांनी त्यांच्या मनातील एक महत्वाची गोष्ट स्नेहा आणि जयला सांगितली. सुरेखा ताई म्हणाल्या, “जेवण बनवताना उत्कर्ष, गायत्री, मीरा होते त्यावेळेस मी तिला म्हटलं की तुम्ही सगळ्यांनी ठरवून आम्हांला चौघांना बाजूला काढलं आहे नॉमिनेट केले आहे... आम्ही तुमच्या दृष्टीने वीक आहोत. आम्ही म्हणजे कोण तर, दादुस, मी, तृप्ती आणि स्नेहा. म्हणून मला तो राग आला. त्यांच्यादृष्टीने जो किचन एरिया आहे त्याला शून्य किंमत आहे. किती पण प्रेमाने करून घाला, जिवाचं रान करा त्याला किंमत नाहीये.”

बिग बॉस मराठी 3
बिग बॉस मराठी 3

तसेच या आठवड्यात कोणता सदस्य घरी जातो हे कळेलच. बिग बॉस मराठी सिझन तिसरा कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.