ETV Bharat / sitara

'कुमकुम भाग्य'च्या अभिनेत्रीला आहे तिच्या वडिलांपासून धोका - Kumkum Bhagya

'कुमकुम भाग्य' या टीव्ही मालिकाची अभिनेत्री तृप्ती शंखधर हिने आपल्या वडिलांपासून आपल्या जीवला धोका असल्याचा दावा केला आहे. तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करुन ही माहिती दिली आहे.

Trupti
तृप्ती शंखधर
author img

By

Published : Aug 26, 2020, 4:27 PM IST

बरेली - बरेली येथील रहिवासी टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री तृप्ती शंखधर हिने आपल्या वडिलांपासून आपल्या जीवला धोका असल्याचा दावा केला आहे. 'कुमकुम भाग्य' फेम अभिनेत्रीने याबाबत सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये ती म्हणत आहे की,आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत लग्न करण्यासाठी ती पळून गेली आहे. त्यामुळे तिचे वडिल चिडले असून ते रागापायी कोणत्याही थराला जाऊ शकतात.

तृप्ती हिने बरेली पोलिसांकडून सुरक्षेची मागणी केली आहे. इतकेच नाही तर तिच्या वडिलांवरही मारहाण केल्याचा आरोप तिने केला आहे. मुंबईला करियर करण्यासाठी जाताना दिलेले पैसेही वडिल परत मागत असल्याचे तिने म्हटलंय.

तृप्तीने हा व्हिडिओ मंगळवारी रात्री तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. १९ वर्षांची तृप्ती आपल्या आईसह घराबाहेर पडली आहे.

तृप्तीचे वडील रिअल इस्टेटचे उद्योगपती आहेत. यासंदर्भात त्यांची बाजू काय आहे याची माहिती घेण्यासाठी अद्याप त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

बरेली पोलिसांनी सांगितले की त्यांना अद्याप कोणतीही लेखी तक्रार मिळाली नाही. मात्र, काही तासांपूर्वीच त्यांना अभिनेत्रीने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टबद्दल माहिती मिळाली. वरिष्ठ पोलिस अधिकारी म्हणाले, “आम्ही या प्रकरणाचा तपास करीत आहोत”.

शंखधर हिने 'कुमकुम भाग्य' सारख्या काही टीव्ही मालिका आणि दक्षिण भारतीय चित्रपटात काम केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.