हैदराबाद - चित्रपट जगतातून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. लोकप्रिय तेलगू अभिनेत्री गायत्री उर्फ डॉली डिक्रूझ हिचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. गायत्री होळी साजरी करून मैत्रिणीसोबत कारमधून कामावर परतत असताना हैदराबादच्या गचीबोवली येथे कार अपघातात तिचा मृत्यू झाला. गायत्रीच्या मृत्यूची माहिती तिची मैत्रिण आणि सह-अभिनेत्री सुरेखा वाणी हिने सोशल मीडियावर दिली आहे. गायत्री 26 वर्षांची होती आणि तिला प्रसिद्ध वेब सीरिज 'मॅडम सर मॅडम अंते' मधून ओळख मिळाली होती.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
गायत्रीच्या मृत्यूमुळे साऊथ फिल्म इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. त्याचवेळी या धक्कादायक बातमीमुळे गायत्रीच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गायत्री शुक्रवारी रात्री तिच्या घरी होळी साजरी करून कारने मित्रासोबत कामावर परतत होती.
रिपोर्टनुसार, गायत्रीचा रोहित नावाचा मित्र कार चालवत होता, मात्र लक्ष विचलित झाल्यामुळे कार डिव्हायडरला धडकली. गायत्रीचा जागीच मृत्यू झाला असून गायत्रीचा मित्र रोहित रुग्णालयात दाखल आहे. रोहितची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
गायत्रीच्या मैत्रिणीने लिहिली भावनिक पोस्ट
गायत्रीच्या मृत्यूची माहिती शेअर करताना तिची मैत्रिण आणि सह-अभिनेत्री सुरेखा वाणी हिने लिहिले की, 'तू आम्हाला इतक्या लवकर कसे सोडून जाऊ शकतेस. आम्ही एकत्र खूप छान वेळ घालवला. मी यावर विश्वास ठेवू शकत नाही. तू लवकरच परत ये, आपण पुन्हा पार्टी करूयात. मला तुझ्यासोबत खूप काही शेअर करायचे आहे. प्लिज, लवकर ये. तू आम्हाला सोडून गेलीस. मी तुला मिस करू इच्छित नाही. तुझ्यावर नेहमीच प्रेम करते'.
कोण आहे गायत्री?
गायत्रीने आपल्या करिअरची सुरुवात यूट्यूबर म्हणून केली होती. 'जलसा रायडू' या यूट्यूब चॅनलवरून तिला ओळख मिळाली. गायत्री सोशल मीडियावर जास्त सक्रिय होती. सोशल मीडियावर गायत्रीला पाच लाखांहून अधिक चाहते फॉलो करतात. गायत्रीचे इंस्टाग्राम अकाउंट तिच्या सुंदर फोटोंनी सजले आहे. गायत्रीने अनेक लघुपटांमध्येही काम केले आहे. ती शॉर्ट फिल्म्सच्या हिट अभिनेत्रींपैकी एक होती.
हेही वाचा - Mc Todfod Passes Away : रॅपर एमसी तोडफोड याचे २४ व्या वर्षी निधन, गल्ली बॉय टीमसह संगीतक्षेत्रात शोककळा