सध्याच्या कोव्हीड वातावरणात विनोद जीवनातील नैराश्य हटविण्यास मदत करतोय. विनोद हे कोणा माणसाचे नाव नसून कॉमेडी या इंग्लिश शब्दाचा मराठी अवतार आहे. इथे विनोद करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला गेला असला तरी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेली १३ वर्षे प्रेक्षकांना आपल्या निखळ विनोदाने प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. एका तपापासून हास्य, प्रेम आणि मनोरंजनाचा प्रसार करीत हा शो आज निःसंशयपणे देशाचा सर्वाधिक आवडता फॅमिली शो झाला आहे. हा भारतातील एकमात्र फॅमिली टीव्ही शो आहे जो सर्व वयोगटातील प्रेक्षकांना हसवून त्यांचे मनोरंजन करीत आहे...
तारक मेहता का उल्टा चष्मा २८ जुलाई, २००८ रोजी प्रथमच सब टीव्ही, सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियावर प्रसारित झाला. नीला फिल्म प्रॉडक्शन्स प्राइवेट लिमिटेड प्रस्तुत भारताचा सर्वाधिक लोकप्रिय टीव्ही शो तारक मेहता का उल्टा चष्मा (TMKOC) ने नुकतेच ३२०० ‘हॅपीसोड्स’ पूर्ण केले. या शो मधील गोकुळधाम सोसायटी आज इतकी प्रसिद्ध झाली आहे कि ती 'मिनी इंडिया' म्हणून ओळखली जाते. तारक मेहता का उल्टा चष्मा असित कुमार मोदी द्वारा लिखित आणि निर्मित आहे. हा कार्यक्रम मराठीत गोकुळधामची दुनियादारी आणि तेलुगू भाषेत तारक मामा अय्यो रामा म्हणून युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे.
तारक मेहता का उल्टा चष्माच्या टीमसाठी हा प्रसंग खास बनला तो कार्यक्रमाच्या एका चाहत्याने भेट म्हणून पाठविलेल्या एका सुंदर स्मृतिचिन्हामुळे. या शिल्पकाराने एका काचेच्या बाटलीत गोकुळधाम परिवाराची फोटो फ्रेम कुशलतेने स्थापित करून ती असित कुमार मोदींना भेट केली आहे. एवढेच नव्हे तर या शिल्पकाराने असितजींना श्री गणेश आणि श्री हनुमानाची मूर्ती ही भेट दिली आहे.
"गेल्या वर्षापासून लॉकडाऊनमुळे शूटिंगमध्ये बऱ्याच अडचणी आल्या आणि आम्ही बरेच चढ-उतार पहिले. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची कलाकार आणि क्रू ची वचनबद्धता वाखाणण्याजोगी आहे आणि त्यामुळेच आज हा शो यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा शो ला प्रेक्षक, प्रशंसक आणि समर्थकांकडून मिळालेले प्रेम आणि समर्थन याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. हास्य, आनंद आणि सकारात्मकतापूर्ण कथा दाखवण्याची प्रेरणा आम्हाला आमच्या प्रेक्षकांच्या आणि प्रशंसकांच्या प्रेमामुळेच मिळते," तारक मेहता का उल्टा चष्माचे निर्माता असित कुमार मोदी म्हणतात.
नीला फिल्म प्रॉडक्शन्स प्राइवेट लिमिटेड प्रस्तुत भारताचा सर्वाधिक लोकप्रिय शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ प्रसारित होतो सोमवार ते शुक्रवार रात्री साडेआठ वाजता सब टीव्हीवर.
हेही वाचा - Sanjeev Kumar and Guru Dutt संजीव कुमार आणि गुरुदत्त यांच्या जन्मदिनी त्यांच्या स्मृतींना वंदन!