मुंबई - लाकडाऊनमध्ये अनेक दुकाने बंद होती, त्यामध्ये दारुच्या दुकानांचाही समावेश होता. दारु मिळणे बंद झाल्यामुळे नियमीत पिणाऱ्या मद्यप्रेमींवर संक्रांत आली होती. त्यानंतर अनेक घटना घडल्या. काही लोकांनी जास्त पैसे देऊन ब्लॅकमध्ये दारु खरेदी केली तर काही ठिकाणी बियर बार आणि वाईन शॉप लुटण्याचे प्रकार घडले. बऱ्याच खटपटीनंतर सुमारे दिड महिन्यांनी दारुची दुकाने पुन्हा उघडण्यात आली आहेत. त्यानंतर मद्य पिलेल्यांची मर्कट लीला हा सोशल मीडियावरील गंमतीचा विषय ठरलाय.
- View this post on Instagram
1st press conference and non official statement after opening liquor shops😜
">
सोशल मीडियावर मद्यपींचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यापैकीचे एक व्हिडिओ आहे नशेत धुंद असलेल्या एका दारु प्रेमीचा. त्याचा दावा आहे की, देशाचा विकास फक्त दारुमुळे होत आहे. हा गंमतीदार व्हिडिओ कॉमेडियन सुनिल ग्रोव्हरने शेअर केला आहे.
या व्हिडिओतील दारु पिलेला व्यक्ती म्हणतो, ''एका दिवसात ४ अरब रुपयांची दारु विक्री झाली. दारुमुळेच सर्व विकास व्हायला लागलाय. जो काही विकास होतोय तो दारुमुळेच होतोय.''
सुनिल ग्रोव्हरने शेअर केलेल्या या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''दारुचे दुकाने उघडल्यानंतर पहिली प्रेस कॉन्फरन्स आणि गैरसरकारी विधान. सुनिलने शेअर केलेला हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.''