ETV Bharat / sitara

पॅरिस सांगून गौरीला दार्जिलिंगला घेऊन गेलो, शाहरुखने सांगितला हनीमूनचा मजेदार किस्सा - bollywood

गौरी आणि शाहरुखचे लग्न झाले होते, तेव्हा शाहरुखकडे काहीच नव्हते. तो खूप गरीब आणि गौरी मध्यमवर्गीय कुटुंबातील होती. एखाद्या चित्रपटाप्रमाणे भासावी, अशी त्यांची लव्हस्टोरी आहे.

पॅरिस सांगून गौरीला दार्जिलिंगला घेऊन गेलो, शाहरुखने सांगितला हनीमूनचा मजेदार किस्सा
author img

By

Published : May 4, 2019, 2:36 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा 'बादशाह' म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खानचे आज भारतातच नाही, तर जगभरात करोडो चाहते आहेत. बॉलिवूड चित्रपटांच्या 'रोमान्सचा बादशाह' म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. मात्र, यशाच्या या शिखरावर पोहोचण्यासाठी त्याला सुरुवातीच्या काळात फार स्ट्रगल करावे लागले होते. त्याची आणि गौरीच्या लग्नाची कथाही फार रंजक आहे. एका अवार्ड शो मध्ये किंग खानने त्याच्या हनीमूनचा एक मजेशीर किस्सा सांगितला आहे.

गौरी आणि शाहरुखचे लग्न झाले होते, तेव्हा शाहरुखकडे काहीच नव्हते. तो खूप गरीब आणि गौरी मध्यमवर्गीय कुटुंबातील होती. एखाद्या चित्रपटाप्रमाणे भासावी, अशी त्यांची लव्हस्टोरी आहे. एका अवार्ड शोमध्ये विकी कौशलने शाहरुख आणि गौरीचा एक फोटो दाखवला होता. त्या फोटोवरून शाहरुखने त्याच्या हनीमूनचा किस्सा सांगितला.

तो म्हणाला, की 'ज्यावेळी गौरीसोबत माझे लग्न झाले होते, त्यावेळी मी तिला आपण पॅरिसला जाऊ, असे सांगितले होते. मात्र, माझ्याकडे तेव्हा पैसे नव्हते. त्यावेळी 'राजू बन गया जेंटलमॅन' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी आम्हाला दार्जिलिंगला जायचे होते. तेव्हा मला असे वाटले, की गौरीला परदेशाविषयी काही माहिती नाही. त्यामुळे मी तिला पॅरिसला सांगून दार्जिलिंगला घेऊन गेलो होतो'. त्याचा गौरीसोबतचा हा फोटो खूप आवडता असल्याचेही त्याने या कार्यक्रमात सांगितले.

SRK and gouri
शाहरुख आणि गौरी

शाहरुख १८ वर्षांचा असताना गौरीला एका पार्टीत भेटला होता. गौरी पहिली मुलगी होती, जिच्यासोबत त्याने पहिल्यांदा डान्स केला होता. २५ ऑक्टोंबर १९९१ मध्ये या दोघांनी लग्न केले. त्यांच्या लग्नाला २७ वर्षे पूर्ण झाली आहेत. आज बॉलिवूडचे सर्वात लोकप्रिय कपल म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.