'टेड टॉक्स इंडिया' लोकप्रिय टॉक शो स्टार प्लसवर सुरू होत आहे. सामाजिक जाणीवा वाढवण्यासाठी विविध प्रश्नांवर या शोमध्ये चर्चा होत असते. 'टेड टॉक्स इंडिया: नई बात' असे शीर्षक असलेल्या या शोचे शाहरुख खान दुसऱ्यांदा अँकरिंग करताना दिसणार आहे.
विशेष म्हणजे 'टेड टॉक्स इंडिया: नई बात'च्या टीमने सेटवर 'नो प्लास्टिक' ही प्रतिज्ञा घेतली आहे. स्टार प्लस, शाहरुख आणि टेड टॉक्स इंडिया यांनी उचललेले हे अभिमानास्पद प्रगतशील पाऊल आहे.
या शोमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील २६ वक्ते सहभागी होणार आहेत. भारतातील पर्यावरण, आरोग्य सेवा आणि लैंगिक शोषण यासारख्या प्रमुख गंभीर विषयावर शोमध्ये चर्चा होणार आहे.
गेल्या सिझनमध्ये पहिल्यांदाच टेडने इंग्रजी भाषासोडून दुसऱ्या भाषेत अशा प्रकारचा टॉक शो प्रसारित केला होता.
"टेड टॉक्स इंडिया: नई बात" चा प्रीमियर २ नोव्हेंबरला शाहरुखच्या वाढदिवसारोजी प्रसारित होईल.