मुंबई - किंग खान शाहरुखची लाडकी लेक सुहाना खान रुपेरी पडद्यापासून दूर असूनही नेहमी चर्चेत असते. आपल्या सोशल मीडियावरुन ती नेहमी स्वतःचे फोटो शेअर करीत असते. सध्या तिचा एक मिरर सेल्फी फोटो चाहत्यांमध्ये कमालीचा उत्सुकतेचा विषय झालाय. सुहाना खान तिच्या मैत्रीणींसह एन्जॉय करीत असताना दिसत आहे. सुहाना सध्या अमेरिकेतील न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
सुहाना खानचा हा फोटो तिच्या फॅन क्लबने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. या फोटोवर भरपूर कॉमेंट्स येत आहेत.
काही दिवसापूर्वी तिने एक स्वतःचा व्हिडिओ शेअर केला होता. यात ती प्रसिध्द रॅपर सिंगर एमिनेम याचे ब्युटीफुल हे गाणे गुणगुणत ताल धरताना दिसत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
सुहानाने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. ती सध्या अमेरिकेत उच्च शिक्षण घेत आहे. तिला रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्याची इच्छा असल्याचे तिने बोलून दाखवलंय. मात्र शाहरुखने शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला तिला दिला होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर ती सिनेक्षेत्रात येईल याची प्रतीक्षा तिचे चाहते करीत आहेत.