स्वामी समर्थ म्हणजे साक्षात आई माऊलीच आहे, याचा प्रत्यय भक्तांना क्षणो क्षणी येतो आहे कारण स्वामी प्रकटदिनाच्या मंगल मुहुर्तावर स्वामी समर्थ आई यांनी आदिमायेच्या रूपात दर्शन दिले. ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ यांचं जीवनकार्य प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद देखील मिळत आहे. स्वामींनी नेहेमीच भक्तांचा उध्दार केला आहे आणि अनेक रूपं घेत त्यांच्या मदतीसाठी धावून गेले आहेत.
आजवर त्यांनी केलेले अनेक चमत्कार, लीला गावकर्यांनी अनुभवल्या, काहींची स्वामींवर श्रद्धा जडली तर अनेकांनी त्यांना कमी लेखले. तरीदेखील कोणाच्याही बोलण्याला न जुमानता त्यांनी भक्तांची मदत करणे सोडले नाही. स्वामींनी अनेक भक्तांना प्रचिती आणून दिली चोळप्पाच्या निस्सीम भक्तीमुळे साक्षात परब्रम्ह स्वरूप स्वामी त्याच्या घरी राहिले. चोळप्पाच्या मुलाची कृष्णप्पाच्या निरागस भक्ती आणि विश्वासामुळे स्वामी चक्क त्याचे सवंगडी झाले, चांदुलीची निरागस,एकनिष्ठ भक्तीच फळ म्हणून स्वामींनी प्रत्येक संकटातून चांदुलीच रक्षण केले आहे.
सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांना शासन देणारे स्वामी भक्तांचे पाठीराखे आहेत. लबाड, दुष्ट दाजीबा आणि रामाचार्याना स्वामी शिक्षा देणार हे नक्की. अश्या सदगुरु श्री स्वामींची भक्त संजीवनी. बिचारी निपुत्रिक म्हणून सासरी खूप छळ होत होता, म्हणून कंटाळलेली संजीवनी तिच्या आराध्य देवतेच्या आई अंबाबाईच्या दर्शनाला कोल्हापुरी पायीच निघाली. कितीही संकटे आली तरीही आईच्या दर्शनाला जायचं, हा संकल्प केला. पण वाटेत रामोशी मागे लागले. सर्वज्ञानी स्वामी आपल्या भक्तांवर संकट कसं येऊ देतील. त्याचवेळी अंबाबाईचा भक्त हनुमंत कोटणीस पायीच दर्शनाला निघाले होते, मात्र वाट चुकले. स्वामींनी वृध्द माणसाचे रूप घेऊन, कोटणीसांना मार्गदर्शन केलं आणि कोटणीस आणि संजीवनीची भेट झाली. स्वामींनी या दोघांना स्वामी आदिमायेच्या रूपात दर्शन दिले हे प्रेक्षकांना खूप भावले आहे.
हेही वाचा - टकाटक’ च्या सिक्वेलच्या शूटिंगला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर झाली सुरूवात!