ETV Bharat / sitara

'कॅन्सल बोर्ड परीक्षा' याचिकेच्या मोहीमेत सोनू सूददेखील सामील - सोनू सूदने विद्यार्थ्यांना आवाहन केले

'कॅन्सल बोर्ड परीक्षा' या याचिकेच्या मोहीमेत बॉलिवूड अभिनेता सोनू सूददेखील सहभागी झाला आहे. त्याने सोशल मीडियावर विद्यार्थांना आवाहन करणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. शिवाय सोनूने लसीकरणाबाबत लोकांचे प्रबोधन करण्यासाठी ''संजीवनी: ए शॉट ऑफ लाइफ'' ही मोहीमही सुरू केली आहे.

Sonu Sood
अभिनेता सोनू सूद
author img

By

Published : Apr 12, 2021, 3:06 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सोनू सूददेखील 'कॅन्सल बोर्ड परीक्षा' या याचिकेच्या मोहीमेत सामील झाला असून त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. अंतर्गत मूल्यांकन पद्धती असावी यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सोनूने विद्यार्थ्यांना आवाहन केले. व्हिडिओमध्ये सोनू असे म्हणतो आहे, की कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांमुळे सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थी परीक्षेसाठी तयार नाहीत.

व्हिडिओमध्ये सोनू सूद म्हणतो, "विद्यार्थ्यांच्या वतीने मला एक विनंती करायची आहे. सीबीएसई आणि बोर्डाच्या परीक्षा ऑफलाइन होणार आहेत, मला वाटत नाही, की या परिस्थितीत विद्यार्थी परीक्षा देण्यास तयार आहेत.''

'कॅन्सल बोर्ड परीक्षा' याचिकेच्या मोहीमेत सोनू सूद

अभिनेता सोनू म्हणाला, "तरीही, आम्ही परीक्षा आयोजित करण्याबद्दल विचार करीत आहोत, जे अन्यायकारक आहे. मला वाटत नाही, की ऑफलाइन परीक्षांसाठी ही योग्य वेळ आहे. सर्वांनी पुढे येऊन या विद्यार्थ्यांचे समर्थन करावे अशी माझी इच्छा आहे, जेणेकरून ते सुरक्षित राहू शकतील."

सोनूने व्हिडीओला कॅप्शन देत म्हटले आहे की, "कठीण परिस्थितीत ऑफलाइन बोर्डाच्या परीक्षेत भाग घेण्यास बाहेर पाडणाऱया सर्व विद्यार्थ्यांना मी विनंती करतो, की दररोज १ लाख ४५ हजार रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे मला वाटते की विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अंतर्गत मुल्यांकनाची पध्दत असायला पाहिजे.''

सोनू सूदने बुधवारी पंजाबमध्ये अमृतसर येथे कोविडची लस घेतली. त्याने लसीकरणाबाबत लोकांचे प्रबोधन करण्यासाठी ''संजीवनी: ए शॉट ऑफ लाइफ'' ही मोहीमही सुरू केली आहे.

हेही वाचा - बाफ्टा'च्या 'इन मेमोरियम'मध्ये इरफान खान आणि ऋषी कपूर यांना श्रध्दांजली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.