सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे आणि या माध्यमांतून देशातील कानाकोपऱ्यातील कालपर्यंत अनोळखी असलेले चेहरे आज स्टार्स झालेले दिसतात. लाखांवर लाईक्सचा पाऊस मिळविणारे हे नवीन ‘स्टार्स’ सध्या डिमांड मध्ये आहेत. त्यांची मनोरंजनसृष्टीत विचारणा होतेय आणि बरेचजण त्याचा भाग होताना दिसताहेत. असेच दोन सोशल मीडिया स्टार्स आहेत विश्वास पाटील आणि गौरी मोरे. ते आता सप्तसूर म्युझिकच्या ‘ चल ना गो पोरी’ या गाण्यात एकत्र दिसणार आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
सप्तसूर म्युझिकचे साईनाथ राजाध्यक्ष यांनी त्यांच्या म्युझिक लेबलच्या माध्यमातून अनेक मराठी गाण्यांची निर्मिती केली आणि त्यांची प्रत्येक गाणी ही हिट झाली. आता त्यांच्या दर्जेदार गाण्यांमध्ये ‘चलना गो पोरी’ हे नवीन गाणं पण आलंय जे तरुण वर्गाला जास्त आवडेल.
'तिचा जडलाय तिच्यावर जीव... त्याला द्यायची आहे त्याच्या प्रेमाची कबुली...’ या वाक्यामुळे कोण आहेत ‘ती’ आणि ‘तो’ असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर तो आणि ती आहेत युथ स्टार, सोशल मिडीयावर सक्रिय असणारे, कंटेट क्रिएटर-कलाकार विश्वास पाटील आणि गौरी मोरे. या दोघांवर चित्रित ‘चलना गो पोरी’ हे कोळी गाणं नुकतंच ‘सप्तसूर म्युझिक’च्या युट्युब चॅनेलवर प्रदर्शित झाले आहे.
‘सप्तसूर म्युझिक’ आणि ‘म्युझिकल काईट्स’ प्रस्तुत, हितेन कोळी आणि भावेश किणी निर्मित ‘चलना गो पोरी’ हे गाणं भावेश किणी यांनी गायले आहे. या गाण्याला संगीत देण्याची आणि या गाण्याचे शब्द लिहिण्याची जबाबदारी देखील भावेश किणी आणि हितेन कोळी यांनी अतिशय सुंदर पध्दतीने पेलली आहे. विश्वास पाटील आणि गौरी मोरे ही नवीन जोडी देखील प्रेक्षकांच्या मनात नक्की घर करेल. स्क्रिनवर दिसलेली विश्वास पाटील आणि गौरी मोरे यांच्यातील केमिस्ट्री, विश्वासने केलेला डान्स यामागे संपूर्ण श्रेय या गाण्याचे दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर भरत जाधव यांचे आहे.
‘चलना गो पोरी’ हे गाणे सप्तसूर म्युझिकच्या युट्युब चॅनेलवर उपलब्ध आहे.
हेही वाचा - अनिल कपूर घेतोय जर्मनीत उपचार, व्हिडिओ शेअर केल्याने चाहत्यांमध्ये संभ्रम