ETV Bharat / sitara

आम्ही जगावं कसं व सरकार: गायक आनंद शिंदे यांचा गाण्यातून कोरोना 'सेवकां'ना सलाम - गायक आनंद शिंदे

कलावंत, सैनिक, पोलीस, डॉक्टर, नर्स यांना गायक आनंद शिंदे यांनी "आम्ही जगावं कसं व सरकार" हे गीत केले समर्पित

Singer Anand Shinde song on corona
आम्ही जगावं कसं व सरकार: गायक आनंद शिंदे यांचा गाण्यातून कोरोना सेवकांना सलाम
author img

By

Published : Mar 31, 2020, 9:21 AM IST

मुंबई - आम्ही जगावं कसं व सरकार या गीतामधून सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी कलावंत, सैनिक, पोलीस, डॉक्टर, नर्स यांच्या व्यथा सांगणारे एक गाणे तयार केले आहे. सोशल मीडियावर या गाण्याची सध्या चर्चा पाहायला मिळत आहे.

या गाण्याबाबत आनंद शिंदे म्हणाले, की 'आज कोरोना विषाणूने संपूर्ण जगात, देशात तसेच राज्यात थैमान घातले आहे. यात लॉकडाऊन परिस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने कलम 144 अन्वये संचारबंदी कर्फ्यु लागू केले आहे. त्यामुळे सैनिक तसेच गृह विभागाचे पोलीस, होमगार्ड कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 24 तास डोळ्यात तेल ओतून ड्युटी बजावत आहेत. तसेच प्रामुख्याने म्हणजे कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांना कोरोनाच्या जबड्यातून बाहेर काढण्यासाठी डॉक्टर, नर्स अहोरात्र क्योरनटाइन कक्ष, विलगीकरण कक्ष (आयसोलेशन वॉर्ड) मध्ये मेहनत घेत आहेत'.

तर, दुसरीकडे सार्वजनिक आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे कर्मचारी शहरचा शहर, नगरे, गावे निर्जंतुकीकरण करण्यासाठी औषध फवारणी करत आहेत. लॉकडाऊन मुळे लावणी, भारूड, वग, लोकसंगित, तमाशा, जागरण गोंधळ व ढोल लेझीम, बॅन्जो पथक, अशा कित्येक प्रकारातून हे कलाकार आपली लोककला सादर करून आपला उदरनिर्वाह करत असतात.

चैत्र महिनापासुन महाराष्ट्रातील अनेक गावाच्या जत्रा आणि यात्रांना सुरवात होत असते. शिवजयंती, आंबेडकर जयंती, लग्न समारंभ, अशा विविध कार्यक्रमात या कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळत असते. यातून मिळणाऱ्या मानधनावर त्यांच्या कुटुबांचा उदरनिर्वाह चालतो.

अशा सर्व कलावंत, सैनिक, पोलीस, डॉक्टर, नर्स, महानगरपालिका कर्मचारी यांना सर्वांना 'आम्ही जगावं कसं व सरकार', या गीतामधून त्यांनी आपल्या भावना समर्पित केल्या आहेत.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

गाण्याची युट्युब लिंक :– https://youtu.be/Ki-zhsQmeIc

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.