सिद्धार्थ शुक्लाचे वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी अचानक निधन झाले. साहजिकच त्याच्या कुटुंबीयांसोबत सर्वांनाच धक्का बसला. तसेच तो अतिशय लोकप्रिय अभिनेता होता आणि त्याचे फॅन फॉलोइंग खूप मोठे होते. अतिशय हँडसम व्यक्तिमत्त्व आणि लाघवी स्वभाव असलेल्या सिद्धार्थच्या प्रेमात अनेक मुली होत्या. सिनेमाच्या हिरोंची फॅन फॉलोइंग खूप मोठ्या प्रमाणात असते. बऱ्याच मोठ्या पडद्यावरील कलाकारांच्यापेक्षा जास्त फॅन फॉलोइंग या छोट्या पडद्यावरील सुपर स्टारचे होते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
सिद्धार्थ शुक्लाच्या अकाली जाण्यामुळे त्याच्या फॅन्सना अतीव दुःख तर झालेच परंतु बरेच फॅन्स तर आजारी पडले. त्याच्या एका फॅनला तर हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले आणि ती कोमात आहे. दुसरी बाब म्हणजे कोरोना परिस्थिती मुळे अनेक फॅन्सना सिद्धार्थचे अंतिम दर्शन घेता आले नव्हते. ही गोष्ट लक्षात घेऊन शुक्ला कुटुंबीयांनी सिद्धार्थच्या फॅन्स साठी एक महत्त्वाची गोष्ट केलीय.
फॅन्स जीव तोडून कलाकारांवर प्रेम करीत असतात. याची कल्पना कलाकारांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना असते. म्हणूनच सिद्धार्थची आई रीटा शुक्ला आणि बहिणी यांनी आज शोकसभा ठेवली असून त्यात सिद्धार्थच्या फॅन्सना देखील सहभागी होता येणार आहे. कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे प्रत्यक्ष भेट न ठेवता ही शोकसभा झूम वर ठेवली आहे. त्यामुळे अनावश्यक गर्दी टाळता येऊन जास्तीत जास्त लोकांना यात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. सोमवारी 6 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता ही ऑनलाईन शोकसभा झूमवर पार पडेल.