ETV Bharat / sitara

सिद्धार्थ मल्होत्रा साकारणार डबल रोल, 'अशी' असणार भूमिका - सिद्धार्थ मल्होत्राच्या भूमिका

मुराद खेतानी आणि भूषण कुमार या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राची दुहेरी भूमिका पाहायला मिळणार आहे.

Siddharh Malhotra will seen in Double role in his upcoming film Thadam Remake
सिद्धार्थ मल्होत्रा साकारणार डबल रोल, 'अशी' असणार भूमिका
author img

By

Published : Feb 25, 2020, 10:50 AM IST

मुंबई - बॉलिवूडचा हँडसम हंक सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच एका दाक्षिणात्य चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार आहे. २०१९ साली प्रदर्शित झालेला तमिळ चित्रपट 'थडम'चा लवकरच हिंदी रिमेक तयार करण्यात येणार आहे. मुराद खेतानी आणि भूषण कुमार या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राची दुहेरी भूमिका पाहायला मिळणार आहे.

'थडम'च्या हिंदी रिमेकचं शीर्षक अद्याप ठरलं नाही. मात्र, यामध्ये सिद्धार्थ उद्योगपती तसेच, छोट्या गावातील चोर अशा दोन्ही भूमिकेत दिसणार आहे. मे महिन्यात या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. दिल्लीच्या काही भागांमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात येणार आहे.

हेही वाचा -सिद्धार्थ मल्होत्राने फॅन्सला दिले खास बर्थडे गिफ्ट, शेअर केले ''शेरशाह''चे पोस्टर

या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत कोणती अभिनेत्री भूमिका साकारणार हे अद्याप जाहीर झाले नाही. मात्र, बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रीची वर्णी या चित्रपटात लागणार असल्याची शक्यता आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लुकही लवकरच प्रदर्शित केला जाणार आहे.

'थडम' या चित्रपटाचे दिग्दर्शन मॅगीझ थिरुमेनी यांनी केले होते. दाक्षिणात्य अभिनेता अरुण विजय यामध्ये मुख्य भूमिकेत दिसला होता. तर, हिंदी रिमेकचे दिग्दर्शन वर्धन केतकर हे करणार आहेत. त्यांचा हा पहिलाच दिग्दर्शनीय चित्रपट आहे. त्यांनी यापूर्वी सिद्धार्थच्या 'ब्रदर्स' आणि 'कपूर अँड सन्स' या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शकाचे काम पाहिले होते. तसेच मुराद यांच्यासोबत २०१७ साली अनिस बझ्मींच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'मुबारकां' चित्रपटासाठीही काम केले आहे.

मुराद खेतानी आणि भूषण कुमार यांचा एकत्रित निर्मिती असलेला हा दुसरा चित्रपट आहे. ते आगामी शाहिद कपूरच्या 'जर्सी' चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. आता ते 'थडम'च्या हिंदी रिमेकसाठी एकत्र आले आहेत.

हेही वाचा -सिध्दार्थ आणि कियारा आफ्रिकेत एकत्र करताहेत जंगल सफारी?

सिद्धार्थ मल्होत्रा या चित्रपटाव्यतिरिक्त विक्रम बत्रा यांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच, 'शेरशाह' चित्रपटात तो कियारा आडवाणीसोबत मुख्य भूमिकेत दिसेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.