मुंबई - प्रसिध्द टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिने नवऱ्यावर घरगुती हिंसेचा आरोप केला आहे. तिच्या बाबतीत ही घटना दुसऱ्यांदा घडत आहे. यापूर्वी २००७ मध्ये तिने याच कारणासाठी राजा चौधरी याच्यासोबत घटस्फोट घेतला होता. यानंतर तिने २०१३ मध्ये अभिनव कोहली याच्यासोबत दुसरा विवाह केला होता. आता पुन्ही ती हाच आरोप अभिनव कोहलीवर करीत आहे.
गेल्या काही वर्षापासून तिच्यात आणि अभिनवमध्ये वाद सुरू होता. यावर तिने मौन बाळगले होते. मात्र अभिनवने श्वेताची मुलगी पलक हिला थप्पड मारण्याची घटना तिला जीवाला लागली. यानंतर ती आक्रमक झाली आहे.
दारुच्या नशेत अभिनव असे वागल्याचे तिने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. रात्री उशीरा तिने अभिनवला पोलिस स्टेशनमध्ये खेचत आणले आणि तक्रार दाखल केली. अभिनववर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
श्वेता तिवारी ही २०१० मध्ये बिग बॉस या शोची विजेती ठरली होती. कसौटी जिंदगी की या टीव्ही मालिकेमुळे ती प्रसिध्दीस आली होती.