ETV Bharat / sitara

कलाकार आणि कामगार संघटनांच्या नकारघंटेमुळे मुंबईत शूटिंग बंदच राहणार! - TV serial shooting

कोरोना संसर्गामुळे गेले तीन महिने संपूर्णपणे बंद असलेली शूटिंग पुन्हा सुरू करण्याची परवानगी राज्य सरकारने काही निर्मिती संस्थांना दिली होती. त्यासोबत कोरोनाबाबत लागू करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्व पाळण्याचे आदेशदेखील त्याना देण्यात आले होते. मात्र सरकार तयार होऊनही कामगार संघटना तयार नसल्याने प्रत्यक्ष शूटिंग सुरू व्हायला वेळ लागण्याची शक्यता आहे.

cinta
सिंटा
author img

By

Published : Jun 23, 2020, 3:41 PM IST

मुंबई - काही दिवसांपूर्वी कामगाराची शिखर संघटना फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज असोसिएशन, सिने आणि टीव्ही कलाकारांची संघटना सिंटा आणि प्रोड्युसर गिल्ड ही निर्मात्यांची संघटना याची एकत्रित बैठक पार पडली. या बैठकीत कामगार संघटनांनी आपल्या काही जुन्या मागण्या पुन्हा नव्याने समोर ठेवल्या. यात प्रामुख्याने 8 तासाची शिफ्ट लागू करणे. डेली वेजेस वर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि ज्युनिअर आर्टिस्टना रोजच्या रोज त्याचा मोबदला अदा करणे, पगारावर काम करणारे कामगार आणि कलाकार याना 90 ऐवजी 30 दिवसांनी त्यांचे पैसे दिले जावे. प्रत्येक कलाकार, तंत्रज्ञ आणि कामगार याचा प्रत्येकी 50 लाखाचा विमा निर्मात्याने काढावा, अशा काही मागण्या करण्यात आल्या होत्या.

हेही वाचा - 'खानां'वर बहिष्कार ट्विटर ट्रेंडनंतर 'शाहरुख पाठिराखे' उतरले मैदानात

याशिवाय कलाकार आणि कामगारांचा पूर्ण वैद्यकीय खर्च निर्मात्याने करावा. सेटवर कायम नर्स वैद्यकीय कर्मचारी आणि ऍम्ब्युलन्स तैनात असावी आशा काही मागण्या करण्यात आल्या होत्या. मात्र यातील काही मागण्या मान्य करायला निर्मात्यांनी नकार दिला. सध्याची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने निर्मात्यांना 30 दिवसात पैसे देता येणे शक्य नाही. तसेच कलाकार आणि कामगार यांचा 25 लाखाचा विमा काढायला त्यांनी काढायला होकार दिला असला तरीही आठ तास काम आणि जास्तीच काम झाल्यास सम्पूर्ण शिफ्टचे पैसे देणे तसच वैद्यकीय खर्चही उचलने हे शक्य नसल्याने निर्मात्यांनी याबाबत काहीही थेट आश्वासन द्यायला नकार दिला आहे. अशात जर मोबदला आणि सुरक्षितता या दोन्ही गोष्टी मिळणार नसतील तर काम करण्याची जोखीम कामगारांनी का घ्यावी असा प्रश्न उपस्थित करून जोपर्यंत याबाबत काही ठोस मार्ग निघत नाही तोपर्यंत शूटिंग सुरू करायची घाई करायची नाही असा पवित्रा फेडरेशन आणि सिंटा या दोन्ही संघटनांनी घेतला आहे.

संघटनामधील चर्चेत आद्यप ठोस काही ठरलेलं नसतानाच राज्य सरकारने निर्मिती संस्थाना शूटिंगची परवानगी देऊन टाकली. त्यामुळे काही मराठी आणि हिंदी मालिकांच शूटिंग उद्यापासून सूरु होणार असल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली. अखेर रात्री उशिरा या दोन्ही संघटनांनी संयुक्त पत्रक जाहीर करून जोवर आपल्या मागण्यांवर तोडगा निघत नाही तोपर्यंत मुंबईत एकही शुटिंग सुरू होऊ देणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे शूटिंग सूरु व्हायला अजून किती दिवसांचा वेळ लागतो ते पहायचं.

हेही वाचा - सुशांतबद्दल सलमानने केलेल्या ट्विटला सोना महापात्राने म्हटले पीआर स्टंट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.