कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर झाला आणि सर्व प्रकारच्या शुटिंग्सवर बंदी घालण्यात आली. त्यामुळे छोट्या पडद्यावरील अनेक मालिका आणि शोज महाराष्ट्राबाहेर शूट होऊ लागले जेणेकरून प्रेक्षकांना नवीन भाग बघायला मिळतील. सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील सुपर डान्सर-चॅप्टर ४ या साप्ताहिक शोचे चित्रीकरणसुद्धा महाराष्ट्राच्याबाहेरील दमण येथे शिफ्ट करण्यात आले. या अचानक बदलामुळे शिल्पा शेट्टी कुंद्रा, जी ‘सुपर डान्सर-चॅप्टर ४’ मध्ये जज म्हणून काम बघते, काही अपरिहार्य कारणास्तव लगेचच युनिटसोबत दमणला जाऊ शकली नाही.
![Shilpa Shetty Kundra returns](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-super-dancer-chapter4-shipa-shetty-comeback-mhc10001_25052021180921_2505f_1621946361_389.jpeg)
शिल्पाच्या अनुपस्थितीत मलाईका अरोराने ते काम पहिले. तसेच अनुराग बसू सुद्धा बदललेल्या वेळापत्रकांची जुळवाजुळव करण्यासाठी मुंबईतच थांबले होते. त्यांची जागा कोरियोग्राफर टेरेन्स लुईस याने भरून काढली. परंतु आता अनुराग बसू आणि शिल्पा शेट्टी कुंद्राचे ‘सुपर डान्सर-चॅप्टर ४’ मध्ये शानदार पुनरागमन झाले असून पुन्हा एकदा शिल्पा शेट्टी कुंद्रा , गीता कपूर, अनुराग बसू हे जजेजचं ओरोजिनल त्रिकुट या शोमध्ये जज म्हणून दिसणार आहेत. ‘सुपर डान्सर-चॅप्टर ४’ चे लहानगे स्पर्धक आणि त्यांचे सुपरगुरू यांनी एका डान्सद्वारे दाखवून दिले की त्या सर्वांनी शिल्पा ला किती ‘मिस’ केले.
![Shilpa Shetty Kundra returns](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-super-dancer-chapter4-shipa-shetty-comeback-mhc10001_25052021180921_2505f_1621946361_331.jpeg)
हेही वाचा - कांताबाई सातारकर यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सांस्कृतीक क्षेत्राचे मोठे नुकसान - बाळासाहेब थोरात