मुंबई - मुंबई गुन्हे शाखेने बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा आणि त्याचा साथीदार रायन थोरपे याच्याविरोधात 1467 पानी आरोपपत्र दाखल केले आहे. याप्रकरणी 1 एप्रिल 2021 रोजी इतर 11 आरोपींविरुद्ध 3,529 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
याबद्दल बोलताना शिल्पा शेट्टी म्हणाली होती की, तिचा पती राज कुंद्रा याचा पॉर्न फिल्म प्रकरणात काहीही संबंध नाही. शिल्पाच्या या विधानानंतर शर्लिन चोप्राने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करुन टीका केली होती.
-
🤪😂🤪 सबसे बड़ी झूठी है दीदी ! भला ऐसा हो सकता है क्या की पति के काम काज की जानकारी न हो ! pic.twitter.com/oRs4YNV7Lh
— डॉ. रिंकू शाह 🇮🇳👩🏫 (@PPisonline1) September 16, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">🤪😂🤪 सबसे बड़ी झूठी है दीदी ! भला ऐसा हो सकता है क्या की पति के काम काज की जानकारी न हो ! pic.twitter.com/oRs4YNV7Lh
— डॉ. रिंकू शाह 🇮🇳👩🏫 (@PPisonline1) September 16, 2021🤪😂🤪 सबसे बड़ी झूठी है दीदी ! भला ऐसा हो सकता है क्या की पति के काम काज की जानकारी न हो ! pic.twitter.com/oRs4YNV7Lh
— डॉ. रिंकू शाह 🇮🇳👩🏫 (@PPisonline1) September 16, 2021
यात ती म्हणते की शिल्पा शेट्टीचे हे बोलणे म्हणजे "येडा बनून पेडा खाण्यासारखे आहे."
शर्लिन म्हणते, दीदी खोटारडी
दरम्यान शिल्पा शेट्टीच्या या विधानावर माध्यमातून बातम्या झळकल्या होत्या. सोशल मीडिया युजर डॉ. रिंकु शाह यांनी एक बातमी शेअर केली होती. या बातमीच्या शीर्षकात राज कुंद्रा प्रकरणात आपल्याला काहीच माहिती नसल्याचे शिल्पा शेट्टीने म्हटलंय.
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने पॉर्न व्हिडिओज केसमध्ये मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलंय की, आपल्या कामामध्ये ती बिझी होती. त्यामुळे पती राज कुंद्रा काय करीत होते हे माहिती नव्हते. ती म्हणाली, मला हॉटशॉट्स किंवा बॉलीफेम अॅप्सबद्दल माहिती नव्हते. मुंबई पोलिसांच्या मते अॅप्सवर राज कुंद्राच कंटेंट अपलोड करीत होता.
सोशल मीडिया युजर डॉ. रिंकु शाह यांच्या या बातमीला उत्तर देताना अभिनेत्री मॉडेल शर्लिन चोप्रा हिने म्हटलंय की, "दीदी सर्वात खोटारडी आहे.!! पतीच्या कामाची माहिती नाही असे कसे असू शकते.!!"
हेही वाचा - Pornography case : राज कुंद्राच्या अडचणीत वाढ, विरोधात साक्षीदार पत्नी शिल्पा शेट्टी