मुंबई - अभिनेत्री सयंतनी घोष ‘कुमकुम’ या मालिकेतून नावारूपास आली. साधारण दीड दशकानंतरही ती मनोरंजनसृष्टीत कार्यरत आहे. नागीन, नामकरण, बॅरिस्टर बाबू सारख्या अनेक मालिकांतून तिने तडफदार भूमिका केल्या आहेत. सध्या ती ‘तेरा यार हूं मैं' या मालिकेतून प्रेक्षकांना रिझवत आहे. सध्या 'घरी राहा व सुरक्षित राहा' या मंत्राचे पालन करत शूटिंगमधून मिळालेल्या सुट्टीचा पुरेपूर वापर सयंतनी करत आहे. ती सोनी सबवरील हलकी-फुलकी मालिका 'तेरा यार हूं मैं' मधील दलजीत बग्गाच्या भूमिकेत उत्तम अभिनयासह प्रेक्षकांची मने जिंकत आहे. सध्या ती या अवघड काळादरम्यान मिळालेल्या सुट्टीचा उपयोग करण्यासोबत स्वत:ला कामात गुंतवून ठेवत आहेत.
!['तेरा यार हूं मैं' फेम सयंतनी घोष](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-sayantani-ghosh-tera-yaar-hun-main-positive-mhc10001_04052021012535_0405f_1620071735_831.jpeg)
'रोगप्रतिकारशक्ती उत्तम असण्याची काळजी'
मुंबईमध्ये जवळपास वर्षभर उन्हाळा असतो. आता अधिकृत उन्हाळा येऊन ठेपला असताना सयंतनी घोष स्वत:ची काळजी घेण्यासाठी या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करत आहेत. याबाबत सांगताना ती म्हणाली, ''उन्हाळा जवळच आला असताना, मी स्वत:ला ताजेतावने व हायड्रेटेड ठेवण्यासाठी लिंबू सरबत किंवा ताक बनवते आणि या पेयांना माझ्या आहारामध्ये समाविष्ट करते. मी आता घरीच असल्यामुळे या वेळेचा उपयोग करत माझी त्वचा कोमल व उजळ करण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यासाठी मी स्वत: बनवलेले विविध फेस मास्क्स वापरत आहे. मी स्वत:ला आरोग्यदायी ठेवण्याचा प्रयत्न करत आहे आणि माझी रोगप्रतिकारशक्ती उत्तम असण्याची काळजी घेत आहे.''
![सुट्टीचा पुरेपूर वापर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-sayantani-ghosh-tera-yaar-hun-main-positive-mhc10001_04052021012535_0405f_1620071735_984.jpeg)
'मेडिटेशनने मला जीवनाच्या उज्ज्वल बाजूकडे पाहण्यास मार्गदर्शन केले'
या कोरोना संक्रमण काळात सयंतनी घोष म्हणाली, ''शूटिंगमधून मिळालेल्या या सुट्टीदरम्यान मी करू शकणाऱ्या गोष्टींची यादी तयार करण्याची आणि घरीच असताना वेळेचा सदुपयोग करण्याची इच्छा आहे. माझा विश्वास आहे की, लहान गोष्टींमध्ये देखील आनंद शोधणे आणि जीवनामध्ये लहान ध्येये ठेवणे महत्त्वाचे आहे. माझ्यासाठी उत्साही व विचारशील राहणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने या अवघड काळादरम्यान योग्य विचारसरणी ठेवली पाहिजे. मला नृत्य करायला आवडते. कधी-कधी मी स्वत:ला आनंदी ठेवण्यासाठी आणि आशावादी उत्साहासह पुढे जाण्यासाठी काही गाणी लावून नृत्य करते. मी फोन व व्हिडिओ कॉल्सच्या माध्यमातून माझ्या प्रियजनांच्या संपर्कात राहते. कधी-कधी गाणी ऐकते. घरी राहण्यासोबत मेडिटेशनने मला जीवनाच्या उज्ज्वल बाजूकडे पाहण्यास मार्गदर्शन केले आहे.''
!['घरी राहा व सुरक्षित राहा' या मंत्राचे पालन करतीये सयंतनी घोष](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-sayantani-ghosh-tera-yaar-hun-main-positive-mhc10001_04052021012535_0405f_1620071735_660.jpeg)
घरी राहण्याचे आवाहन
सयंतनी शेवटी म्हणाली, ''आपण सर्वात आव्हानात्मक काळाचा सामना करत आहोत. त्यामुळे आपल्यासोबत आपल्या अवतीभोवती असलेल्या व्यक्तींची देखील काळजी घेणे महत्त्वाचे आहे. मी सर्वांना घरीच राहण्याचे व सुरक्षित राहण्याचे आवाहन करते. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा.'' सयंतनीने प्रेक्षकांना आश्वासित केले आहे की लवकरच त्यांची मालिका ‘तेरा यार हूं मैं' नवीन एपिसोड्ससह परतणार आहे.
![स्वत:ला कामात गुंतवून ठेवते सयंतनी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-sayantani-ghosh-tera-yaar-hun-main-positive-mhc10001_04052021012535_0405f_1620071735_266.jpeg)
हेही वाचा - शुभ्राच्या आयुष्यात येणार एक नवी व्यक्ती; चिन्मय उदगीरकरची एंट्री