ETV Bharat / sitara

‘मी होणार सुपरस्टार...जल्लोष डान्सचा’ कार्यक्रमातून संस्कृती बालगुडेचे सूत्रसंचालनात पदार्पण! - संस्कृती बालगुडे सूत्रसंचालन

अप्रतिम नृत्यांगना आणि सशक्त अभिनेत्री असणाऱ्या संस्कृती बालगुडेने मराठी मालिका आणि चित्रपटांतून विविधांगी भूमिका केल्यात. आता ती एका नवीन क्षेत्रात पदार्पण करतेय.

Sanskriti Balgude
संस्कृती बालगुडे
author img

By

Published : Aug 7, 2021, 7:58 PM IST

मुंबई - मराठी मनोरंजनसृष्टीतील एक ग्लॅमरस नाव म्हणजे संस्कृती बालगुडे. अप्रतिम नृत्यांगना आणि सशक्त अभिनेत्री असणाऱ्या संस्कृतीने मराठी मालिका आणि चित्रपटांतून विविधांगी भूमिका केल्यात. आता ती एका नवीन क्षेत्रात पदार्पण करतेय. ‘मी होणार सुपरस्टार...जल्लोष डान्सचा’ कार्यक्रमातून संस्कृती सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. खरंतर ती तब्बल ८ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करतेय.

संस्कृतीला वेगवेगळ्या रुपात याआधी प्रेक्षकांनी पाहिलं आहे. पण मी होणार सुपरस्टार मधला तिचा ग्लॅमरस अंदाज अनोखा असणार आहे. संस्कृती पहिल्यांदाच सूत्रसंचालिकेच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्टार प्रवाहवर २१ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या ‘मी होणार सुपरस्टार...जल्लोष डान्सचा’ या कार्यक्रमाच्या अनुषंगाने टेलिव्हिजन धमाकेदार कमबॅकसाठी सज्ज झाली आहे.

हेही वाचा - टायगर श्रॉफने गायले 'वंदे मातरम', गाण्यासाठी दिशा पाटनी झालीय उतावीळ

याबाबत सांगताना संस्कृती म्हणाली, ‘नृत्य ही माझी आवड आहे. माझ्या करिअरची सुरुवातच नृत्याने झाली. त्यामुळे हा मंच नवी ऊर्जा देतो. मी पहिल्यांदाच सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडते आहे त्यामुळे उत्सुकता नक्कीच आहे. स्टार प्रवाहसोबत मी पहिल्यांदाच या कार्यक्रमाच्या निमित्ताने जोडली गेली आहे. मी होणार सुपरस्टार कार्यक्रमाचं वेगळेपण सांगायचं तर या मंचावर संपूर्ण महाराष्ट्रातून आलेलं भन्नाट टॅलेण्ट. स्पर्धकांचे डान्स परफॉर्मन्सेस पाहून अवाक व्हायला होतं.’

संस्कृती पुढे म्हणाली, ‘आमचा सुपरजज अंकुश चौधरी आणि कॅप्टन्स वैभव घुगे आणि कृती महेश यांनी या कार्यक्रमात वेगळी रंगत आणली आहे. त्यामुळे मी होणार सुपरस्टार हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी नवी पर्वणी असणार आहे. स्पर्धकांना थिरकताना पाहून माझेही पाय थिरकायला लागतात. या कार्यक्रमात माझा वेगळा लूकदेखिल पाहायला मिळेल. स्टायलिस्ट नेहा चौधरीने माझा लूक डिझाईन केला आहे. त्यामुळे मी टेलिव्हिजन कमबॅकसाठी खूपच उत्सुक आहे.’

‘मी होणार सुपरस्टार... जल्लोष डान्सचा’ हा मराठी रियालिटी शो सुरु होतोय स्टार प्रवाहवर, येत्या २१ ऑगस्टपासून दर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता.

हेही वाचा - ‘ओव्हर द टॉप’ ठरणार भारताचा ओटीटी -स्वप्निल जोशी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.