ETV Bharat / sitara

'बहुत हुआ सन्मान'साठी वाराणसीच्या आश्रमात राहिला संजय मिश्रा - 'बहुत हुआ सन्मान' हा चित्रपट डिस्ने हॉटस्टार व्हीआयपीवर

'बहुत हुआ सन्मान' हा चित्रपट डिस्ने हॉटस्टार व्हीआयपीवर रिलीज झाला आहे. याच्या शूटिंगच्यावेळी संजय मिश्रा वाराणसीमध्ये आश्रमात राहिला होता. या शहराबद्दल असलेली भावना त्याने व्यक्त केली आहे.

Sanjay Mishra
संजय मिश्रा
author img

By

Published : Oct 3, 2020, 6:02 PM IST

मुंबई - अभिनेता संजय मिश्रा अलिकडेच वाराणसीमध्ये एका आश्रमात थांबला होता. 'बहुत हुआ सन्मान' या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी तपश्वी जीवनशैली अनुभवण्यासाठी त्याला ही संधी मिळाली. या चित्रपटात राघव जुयाल, अभिषेक चौहान, राम कपूर, निधि सिंह आणि नमित दास यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

संजय मिश्रा म्हणाला, "वाराणसीचे शब्दात वर्णन करणे जवळपास अशक्य आहे. ही एक अशी भावना आहे जी आपल्याला जोडून ठेवते. मी जेव्हाही या शहराचा दौरा करतो तेव्हा मागे काही तरी राहून गेले असे वाटत राहते.''

तो म्हणाला, "'बहुत हुआ सन्मान' चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी मी कलाकार आणि क्रू मेंबर्ससोबत या पवित्र शहराला भेट दिली. ते दिवस खरोखर संस्मरणीय आहेत. राघव, अभिषेक आणि मी शहराचा खऱ्या अर्थाने आनंद घेण्यासाठी सुमारे एक महिना आश्रमात राहिलो. हा एक आनंददायक अनुभव होता. "

संजय मिश्रा यांनी सेटवरील कलाकारांसाठी जेवणही बनवले.

राघव म्हणाला, ''आम्ही शूटिंगमध्ये खूप मजा केली. संजय आणि अभिषेकसोबत आश्रमात राहण्यापासून ते प्रत्येक दिवशी संजय आमच्यासाठी खास पदार्थ बनवायचे, त्याचा आनंद घेतला.''

अविनाश सिंग आणि विजय नारायण वर्मा यांनी लिहिलेल्या 'बहूत हुआ सन्मान' डिस्ने हॉटस्टार व्हीआयपी वर रिलीज झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.