मुंबई - संजय दत्त आणि पूजा भट्ट यांच्या गाजलेल्या 'सडक' चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर यांची जोडी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर, संजय दत्तचीही महत्वपूर्ण भूमिका यामध्ये राहणार आहे. मात्र, 'सडक २' चित्रपटाला होकार देण्यासाठी एक खास कारण असल्याचं संजय दत्तने सांगितलं आहे.
संजय दत्त आणि महेश भट्ट हे १९८६ साली 'नाम' चित्रपटासाठी एकत्र आले होते. हा त्यांचा पहिलाच चित्रपट होता. महेश भट्ट यांच्याबद्दल बोलताना त्याने सांगितलं, की 'महेश भट्ट हे महान दिग्दर्शक आहेत. ते त्यांचे काम अतिशय चपखलपणे पूर्ण करतात. 'सडक' चित्रपटादरम्यान त्यांच्या या परफेक्शनचा अंदाज आला होता. चित्रपटाच्या सेटवरही ते एखाद्या तरुणाप्रमाणे काम करत असतात.
हेही वाचा -कंगनाने चक्क दरोडेखोरांचा केलाय सामना, स्वत:च केला खुलासा
'सडक २' चित्रपटालाही तेच योग्य न्याय देऊ शकतात, असे मला वाटल. या चित्रपटात काम करण्यासाठी मी एकाच अटीवर तयार झालो. या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन महेश भट्ट यांचंच असावं, अशी माझी इच्छा होती', असं संजय दत्तने सांगितलं आहे. जर, महेश भट्ट या चित्रपटाचे दिग्दर्शक नसते, तर मी या चित्रपटात पुन्हा परतलो नसतो, असंही तो म्हणाला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
'सडक २' हा चित्रपट १० जुलै २०२० ला प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -सैफ अलीचा मुलगा इब्राहिम आहे क्रिकेटमध्ये ऑलराऊंडर, पतौडींचा वारसा चलवणार का छोटे नवाब?
या चित्रपटाशिवाय, संजय दत्त 'शमशेरा', 'केजीएफ चॅप्टर २' आणि 'भूज - द प्राईड ऑफ इंडिया' या चित्रपटातही झळकणार आहे.