ETV Bharat / sitara

जेव्हा वरुण धवन, अभिषेक बच्चनच्या चेंडुंवर सचिनने केली फटकेबाजी - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर

सचिनने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये वरुण धवन आणि अभिषेक बच्चन दोघेही सचिनची विकेट घेण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र, सचिन अगदी सावधगिरीने त्यांच्या चेंडुंवर फटकेबाजी करताना दिसतो.

जेव्हा वरुण धवन, अभिषेक बच्चनच्या चेंडुंवर सचिनने केली फटकेबाजी
author img

By

Published : Aug 30, 2019, 10:10 AM IST

मुंबई - राष्ट्रीय क्रीडा दिवसानिमित्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो अभिनेता वरुण धवन आणि अभिषेक बच्चन यांच्यासोबत गली क्रिकेट खेळताना पाहायला मिळतो. यावेळी त्याने वरुण धवन आणि अभिषेक बच्चनच्या चेंडुंवर दमदार फटकेबाजी केली. कामासोबतच खेळालाही महत्व दिले पाहिजे, असे सचिनने म्हटले आहे.

सचिनने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये वरुण धवन आणि अभिषेक बच्चन दोघेही सचिनची विकेट घेण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र, सचिन अगदी सावधगिरीने त्यांच्या चेंडुंवर फटकेबाजी करताना दिसतो. वरुणने याबद्दल त्याची प्रशंसाही केली आहे.

जेव्हा वरुण धवन, अभिषेक बच्चनच्या चेंडुंवर सचिनने केली फटकेबाजी

फिट इंडिया अभियानाला दिलं समर्थन -
पंतप्रधान मोदींनी २९ ऑगस्ट रोजी फिट इंडिया अभियानाद्वारे नागरिकांना फिट राहण्याचे आवाहन केले आहे. या अभियानाला सचिन तेंडुलकरनेही समर्थन दिले आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.