मुंबई - 'दोन स्पेशल' या कार्यक्रमामध्ये पुढील आठवड्यात सचिन पिळगांवकर आणि अवधूत गुप्ते आपल्याला दिसणार आहेत. जितेंद्र जोशी यांनी त्यांच्यासोबत दिलखुलास गप्पा मारल्या आहेत.... गप्पागोष्टींसोबत सचिन पिळगांवकर यांनी काही कधी न सांगितलेले किस्से, आठवणी मंचावर सांगितले आहेत.
या दोघांमध्ये प्रश्न-उत्तरांचा गेम देखील रंगला. सचिन पिळगांवकर यांनी श्रीया आणि त्यांच्यामध्ये घडलेला एक किस्सा सांगितला... जितेंद्र जोशी यांनी जेव्हा सचिन पिळगांवकर यांना विचारले “तुम्ही कधी श्रीयाला सांगितले आहे का हे कर, किंवा हे करू नकोस ? त्यावर ते म्हणाले अजिबात नाही, त्या भानगडीत मी कधीच पडलो नाही. ती ऐकणार नाही आणि तिने ऐकू पण नये, असे मला वाटते.
त्यावर अवधूतने सांगितले, जेव्हा आम्ही बाहेर गेलो होतो तेव्हा मी आणि माझ्या बायकोने श्रीयाला प्रोत्साहन दिले की तू अभिनय करायला पाहिजे... त्यावर सचिन पिळगांवकर म्हणाले, ‘याने सांगितल्यावर माझ्या डोक्यामध्ये सूत्र सुरू झाली होती, आणि मी परत येताना तिला विचारले की, मी विचार करतो आहे चित्रपट बनावायचा तर तू करशील का? त्यावर तिने दिलेले उत्तर ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटेल, ती त्यावेळेस म्हणाली “मला स्क्रिप्ट द्या मी ठरवते”.
पुढे जितेंद्र जोशी यांनी सचिन पिळगांवर यांना विचारले, “एका कलाकाराने असे म्हंटले होते की, सचिन पिळगांवकर हे बॅग आणि बॅगेजेस घेऊन येतात ते जर त्यांनी नाही केले तर त्यांच्यासारखा दुसरा अभिनेता नाही... यावर त्यांनी सडेतोड उत्तर दिले, ते काय होते याचे उत्तर प्रेक्षकांना पुढील आठवड्यातील दोन स्पेशलच्या भागामध्ये मिळेल.
सचिन पिळगांवकर यांनी दोन स्पेशलच्या मंचावर गुरुदत्त साहेब यांच्यासोबत झालेल्या भेटीची आठवण सांगितली... गुरुदत्त साहेब यांच्या निधनानंतर आत्मारामजी म्हणजे गुरुदत्तजी यांचे धाकटे बंधू त्यांचा फोन का आला आणि पुढे ते काय म्हणाले? ते ही आपल्याला या कार्यक्रमात पहायला मिळणार आहे.
याचसोबत एका गेममध्ये त्यांना गाणी ओळखायची होती तर दुसर्या गेममध्ये त्यांना विचारलेल्या प्रश्नांची हो की, नाहीमध्ये उत्तर द्यायची होती... भाजीमार्केटमध्ये बार्गेनिंग केले आहे का? यावर दोघांनी हो असे उत्तर दिले... बायकोसाठी कधी गजरा घेऊन गेला आहात का? हा प्रश्नांचा हा गेम सुरू राहिला... सचिन पिळगांवकर यांना जेव्हा त्यांच्या वडिलांचा फोटो दाखवला तेव्हा ते अत्यंत भावूक झाले..