ETV Bharat / sitara

जाणून घ्या सत्य : ऋषभ पंतने उर्वशी रौतेलाला 'व्हॉट्सअॅप'वर केले ब्लॉक?

भारतीय क्रिकेटर ऋषभ पंत याने बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिला व्हाट्सअपवर ब्लॉक केल्याचे सध्या चर्चा आहे. या मागील खरे सत्य काय आहे हे जाणून घ्या...

author img

By

Published : Jan 11, 2020, 7:54 PM IST

Rishabh Pant
ऋषभ पंत

मुंबई - क्रिकेटर ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांचे नाव बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाशी जोडले जात होते. मात्र हार्दिकने नताशा स्तान्कोविक हिला प्रपोज केल्यामुळे ऋषभचे नाव उर्वशीसोबत कायम होते. मात्र नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच ऋषभने आपल्या गर्लफ्रेंडची ओळख सर्वांना करुन देत चकित केले. ईशा नेगीसोबतचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे अगोदरच्या चर्चेला पूर्ण विराम देण्यात तो यशस्वी झाला.

अशातच एक नवी बातमी सध्या झळकली आहे, त्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ऋषभने उर्वशी रौतेला हिला व्हाट्सअपवर ब्लॉक केल्याची सध्या चर्चा आहे. मात्र उर्वशी रौतेलाशी संबंधित बॉलिवूड सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही बातमी खोटी आहे. ऋषभने तिला ब्लॉक केल्याची केवळ अफवा आहे. ऋषभ आणि उर्वशी यांच्याशी संबंधित सर्व बातम्या खोट्या आहेत. उर्वशीने मात्र अद्याप यावर कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

'सिंह साब दी ग्रेट या चित्रपटातून उर्वशी रौतेलाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ती एक उत्तम मॉडेल आणि डान्सर आहे. आपल्या वयाच्या १५ व्या वर्षीच तिने मॉडेलिंग सुरू केले होते. मिस युनिव्हर्स स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

Intro:Body:

ent news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.