ETV Bharat / sitara

'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये नवीन ट्विस्ट; जुनी शनाया येणार परत..! - माझ्या नवऱ्याची बायको रसिका सुनील

स्वावलंबी, कर्तृत्ववान आणि सर्वांची आवडती 'राधिका', तिच्या नवऱ्याला आपल्या तालावर नाचवणारी 'शनाया' आणि यामध्ये अडकलेला 'गुरूनाथ' या तिघांची अफलातून केमिस्ट्री हे या मालिकेच्या यशाचे गमक आहे. लॉकडाऊननंतर आता परवानगी मिळाल्यामुळे, सर्व नियम व अटींचे पालन करुन या मालिकेचे चित्रीकरण पुन्हा सुरू होणार आहे...

Rasika Sunil to replace Isha Keskar as Shanaya in Mazya Navryachi Bayko
'माझ्या नवऱ्याची बायको' मध्ये नवीन ट्विस्ट; जुनी शनाया येणार परत..!
author img

By

Published : Jul 5, 2020, 3:18 PM IST

मुंबई : "सुखी संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं" असे म्हणत सुरू झालेली माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर गेल्या कित्येक महिन्यांपासून राज्य करत आहे. टीआरपीचे नवे उच्चांक गाठलेल्या या मालिकेचे चित्रीकरण लॉकडाऊनमुळे गेल्या काही दिवस बंद होते. मात्र, आता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येत आहे. एवढेच नाही, तर यामध्ये एक नवीन ट्विस्टदेखील असणार आहे.

स्वावलंबी, कर्तृत्ववान आणि सर्वांची आवडती 'राधिका', तिच्या नवऱ्याला आपल्या तालावर नाचवणारी 'शनाया' आणि यामध्ये अडकलेला 'गुरूनाथ' या तिघांची अफलातून केमिस्ट्री हे या मालिकेच्या यशाचे गमक आहे. लॉकडाऊननंतर आता परवानगी मिळाल्यामुळे, सर्व नियम व अटींचे पालन करुन या मालिकेचे चित्रीकरण पुन्हा सुरू होणार आहे.

जुनी शनाया येणार परत..

ही मालिका जेव्हा सुरू झाली होती, तेव्हा यामध्ये शनाया म्हणून रसिका सुनील काम करत होती. प्रेक्षकांना तिने साकारलेली शनाया फार म्हणजे फारच आवडून गेली. मात्र, त्यानंतर काही कारणास्तव या मालिकेत रसिकाऐवजी इशा केसकरची एन्ट्री झाली. मात्र, आता प्रेक्षकांची आवडती जुनी शनाया, म्हणजेच रसिका सुनील या मालिकेत री-एन्ट्री करणार आहे!

मिळालेल्या माहितीनुसार, इशा केसकर सध्या आपल्या दातांवर उपचार घेत आहे. ही ट्रीटमेंट बरीच लांबणार असल्यामुळे, मालिकेत रसिकाला पुन्हा घेण्यात येणार आहे. जुनी शनाया तर परत येणार; मात्र तिला पाहण्यासाठी प्रेक्षकांना १३ जुलैपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

हेही वाचा : सुदर्शन पटनायक यांनी वाळूच्या कलाकृतीतून वाहिली सरोज खान यांना श्रद्धांजली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.