मुंबई - अभिनेत्री रसिका दुग्गल सध्या उटीमध्ये असून येथे ती 'आऊट ऑफ लव्ह' च्या दुसर्या सीझनचे शूटिंग करत आहे. यावेळी रसिका कामामध्ये व्यग्र राहून दिवाळीचा सण साजरा करत आहे. रसिका शूटींगच्या सेटवर वर्किंग दिवाळी साजरी करणार आहे.
रसिका म्हणाली, "आम्ही सहसा दिवाळी आपल्या कुटुंबियांसह आणि मित्रांसमवेत साजरी करतो, परंतु यावर्षीच्या अनिश्चिततेमुळे आम्हाला बर्याच वेगवेगळ्या गोष्टी करायला लागल्या आहेत. आवश्यक त्या सुरक्षा उपायांमुळे, आमच्यातील काही लोक कामावर परतले आहेत या गोष्टीमुळे मी आभारी आहे."
हेही वाचा- वाणी कपूर हॉटेलच्या खोलीतच साजरी करणार दिवाळी
रसिका पुढे म्हणाली, "व्यग्र वेळापत्रकानुसार मी सेटवर परत आल्याचा मला आनंद झाला आहे. तसेच निलगिरीच्या टेकड्यांमध्ये घरात सात महिने राहिल्यानंतर खूप आनंद झाला आहे. 'मिर्झापूर २ आणि' 'अ सुटेबल बॉय' ला जबरदस्त प्रतिसाद मिळाल्यामुळे मी पुन्हा 'आऊट ऑफ लव्ह' च्या दुसऱ्या सीझनच्या कामात सामील झाले आहे. शूटिंगचा हा आनंद माझी दिवाळी झगमगाट करणारा ठरेल. "
हेही वाचा- अभिनेत्री रविना टंडन वेब सीरिजच्या शूटिंगसाठी मनालीत