ETV Bharat / sitara

रणवीर सिंगने शेअर केला '८३' च्या क्रिकेट विश्वचषक विजयाचा इतिहास, पाहा व्हिडिओ - video

रणवीरसह या चित्रपटाची संपूर्ण टीम सध्या या चित्रपटासाठी अथक मेहनत घेताना दिसतेय. १९८३ सालचा क्रिकेट विश्वचषक स्पर्धा पुन्हा या चित्रपटातून पाहायला मिळणार असल्याने चाहत्यांनाही या चित्रपटाबद्दल आतुरता आहे.

रणवीर सिंगने शेअर केला '८३' च्या क्रिकेट विश्वचषक विजयाचा इतिहास, पाहा व्हिडिओ
author img

By

Published : Jun 1, 2019, 1:27 PM IST

मुंबई - अभिनेता रणवीर सिंग हा '८३' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात तो कपिल देव यांच्या भूमिकेत झळकणार आहे. १९८३ साली झालेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने मिळवलेल्या एतिहासिक विजयावर आधारित हा चित्रपट आहे. सध्या रणवीर सिंगची संपूर्ण टीम ही लंडनला रवाना झाली आहे. रणवीरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एका व्हिडिओद्वारे '८३' च्या क्रिकेट विश्वचषक विजयाचा इतिहास उलगडला आहे.

भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकल्यानंतर देशभरात आनंदोस्तव साजरा करण्यात आला होता. माध्यमांमध्येही या विजयाचा थरार मांडण्यात आला होता. त्याचे काही फोटो रणवीरने व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केले आहेत.

रणवीर सिंगने शेअर केला '८३' च्या क्रिकेट विश्वचषक विजयाचा इतिहास, पाहा व्हिडिओ

रणवीरसह या चित्रपटाची संपूर्ण टीम सध्या या चित्रपटासाठी अथक मेहनत घेताना दिसतेय. १९८३ सालचा क्रिकेट विश्वचषक स्पर्धा पुन्हा या चित्रपटातून पाहायला मिळणार असल्याने चाहत्यांनाही या चित्रपटाबद्दल आतुरता आहे.

Ranveer Sing with Kapil dev
कपिल देव यांच्यासोबत रणवीर सिंग

रणवीरने कपिल देव यांच्या भूमिकेसाठी त्यांच्या घरी राहुन १० दिवस प्रशिक्षण घेतले. या चित्रपटात रणवीरसोबतच आर. बद्री, हार्डी संधू, चिराग पाटील, साकिब सलीम, पंकज त्रिपाठी, ताहीर भसिन, अॅमी विर्क आणि साहिल खट्टर हे कलाकार झळकणार आहेत.

'चक दे इंडिया'चे दिग्दर्शक कबिर खान यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. १० एप्रिल २०२० ला हा चित्रपट प्रदर्शित होईल.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.