ETV Bharat / sitara

‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेत संजू, रणजीत आणि कुसुमावतीमधील अबोला करणार दूर - raja rani chi ga jodi

‘राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये काही दिवसांपूर्वी आईसाहेबांनी म्हणजेच कुसुमावतीने रणजीत आणि संजूचे बाळ पाडले होते. हे सत्य बेबीमावशीने सगळ्यांपुढे आणले होते. रणजीतला याबद्दल काहीही कल्पना नसताना, त्याला खोट सांगून आईसाहेबांनी हा प्रकार घडवून आणला. हे समजल्यावर रणजीतने कुसुमावतीला आई म्हणणार नाही, असे वचन दिले होते.

http://10.10.50.85//maharashtra/27-June-2021/mh-mum-ent-raja-ranichi-g-jodi-sanju-ranjit-kusumavati-patchup-mhc10001_27062021015311_2706f_1624738991_1022.jpeg
‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेत संजू, रणजीत आणि कुसुमावतीमधील अबोला करणार दूर
author img

By

Published : Jun 27, 2021, 8:37 PM IST

‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेतील नवनवीन ट्विस्ट्समुळे ती बरीच लोकप्रिय होतेय. नुकतीच संजू फौजदारीणबाई बनली आणि ढालेपाटलांच्या दारात पुन्हा एकदा लाल दिव्याची गाडी आली. तसेच नुकतीच वटपौर्णिमा येऊन गेली आणि मालिकेत संजीवनीची वटपौर्णिमेची पूजा कशी पूर्ण नाही होणार याच्या प्रयत्नात गुलाब होती. तर दूसरीकडे कुसुमावतीला संजूने वटपौर्णिमाची पूजा करणार असे वचन दिले होते आणि रणजीतच्या साथीने संजूने पूर्ण केलं. आता ‘राजा रानीची गं जोडी’ मालिकेमध्ये एक नवा अध्याय सुरू झाला आहे.

पीएसआय झाल्यापासून तिच्या आयुष्यात बरेच बदल झाले आहेत. पण संजू घर आणि नोकरी या दोन्ही जबाबदार्‍या उत्तमरीत्या पार पाडताना दिसते आहे. ‘राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये काही दिवसांपूर्वी आईसाहेबांनी म्हणजेच कुसुमावतीने रणजीत आणि संजूचे बाळ पाडले होते. हे सत्य बेबीमावशीने सगळ्यांपुढे आणले होते. रणजीतला याबद्दल काहीही कल्पना नसताना, त्याला खोट सांगून आईसाहेबांनी हा प्रकार घडवून आणला. हे समजल्यावर रणजीतने कुसुमावतीला आई म्हणणार नाही, असे वचन दिले होते.

त्यानंतर मालिकेमध्ये नऊ महिन्यांचा लिप घेण्यात आला आणि संजू पीएसआय बनून ढालेपाटलांच्या घरी आलीये. घरी परतल्यावर तिला कळते की रणजीत आणि कुसुमावती यांच्यामधील अबोला कायम आहे. मध्ये इतका काळ लोटूनही ते दोघे एकमेकांशी आपुलकीने बोलत नाहीयेत हे बघून संजूची चलबिचल होते. आणि ती आईसाहेबांना वचन देते की, ‘रणजीत आणि तुमच्यामधील अबोला मी नक्कीच दूर करेन’. या सर्व प्रकाराबद्दल रणजीत अनभिज्ञ आहे.

संजूने केलेल्या कृतीमुळे रणजीत कुसुमावतीला आईसाहेब म्हणून पुन्हा हाक मारणार आहे. हे कसे आणि कशारितीने घडले याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता नक्कीच असेल. रणजित कुसुमावतीला पुन्हा आईसाहेब अशी हाक का मारतो आणि त्यांच्यातील दुरावा संजू कसा मिटवते हे जाणून घेण्यासाठी ‘राजा रानीची गं जोडी’ ही मालिका पाहावी लागेल. ‘राजा रानीची गं जोडी’ ही मालिका प्रसारित होते संध्या. ७.०० वा. कलर्स मराठीवर.

हेही वाचा - अर्जुन कपूरच्या वाढदिवसानिमित्य मलायकाने पोस्ट केला रोमँटिक फोटो

हेही वाचा - ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेत अभिनेते कश्यप परुळेकर साकारणार नेतोजी पालकर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.