ETV Bharat / sitara

‘रंग माझा वेगळा’ मालिकेत दीपाच्या चारित्र्यावर संशय? - rang maza vegla

मुंबई - महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे सर्वच शूटिंग्सना खीळ बसली. परंतु, जवळपास सर्वच मालिका आता शूटिंगसाठी महाराष्ट्राबाहेर गेल्या आहे. स्टार प्रवाह वरील ‘रंग माझा वेगळा’ ची टीम पोहोचली आहे निसर्गरम्य गोव्यात. प्रेक्षकांच्या मनोरंजनात कमतरता पडू नये म्हणून ते गोव्यात नवीन भागांचं शूटिंग करताहेत.

रंग माझा वेगळा
रंग माझा वेगळा
author img

By

Published : Apr 29, 2021, 9:44 AM IST

मुंबई - महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे सर्वच शूटिंग्सना खीळ बसली. परंतु, जवळपास सर्वच मालिका आता शूटिंगसाठी महाराष्ट्राबाहेर गेल्या आहे. स्टार प्रवाह वरील ‘रंग माझा वेगळा’ ची टीम पोहोचली आहे निसर्गरम्य गोव्यात. प्रेक्षकांच्या मनोरंजनात कमतरता पडू नये म्हणून ते गोव्यात नवीन भागांचं शूटिंग करताहेत.

दीपाचा ठाम निश्चय
दीपाचा ठाम निश्चय
स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. मालिकेतील प्रमुख व्यक्तिरेखा दीपाच्या रंगावर प्रश्न उठवले गेले पण ती शांत राहिली. तिच्या अस्तित्वावर प्रश्न उठवले गेले पण तरीही ती शांत राहिली. मात्र, जेव्हा तिच्या चारित्र्यावर संशय उठवला गेला तेव्हा मात्र तिने याविरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला. कारण पण तसेच आहे. आजवर इतिहासात अग्निपरीक्षा दिलेल्या असंख्य पतिव्रता आपण पाहिल्या आहेत. पण पातिव्रत्य सिद्ध करण्यासाठी प्रत्येक वेळेस स्त्रीनेच का अग्नीपरीक्षा द्यावी या मताशी दीपा ठाम आहे. आई होण्याचं सुख दीपाच्या पदरी पडलं खरं पण ते तिला उपभोगता येत नाहीये. कारण खुद्द कार्तिकनेच दीपाच्या चारित्र्यावर संशय घेत पितृत्व नाकारलं आहे. डीएनए टेस्ट कर अथवा घर सोडून जा असे दोन पर्याय असताना स्वाभिमानी दीपाने घर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. कार्तिकचं घर सोडून ती मोठ्या आशेने माहेरी आलीय. मात्र इथेही बाबांनी तिला पुन्हा सासरी जाण्याचाच सल्ला दिला आहे. त्यामुळे या कठीण काळात दीपाला कोण साथ देणार हे पहाणं उत्सुकतेचं असेल आणि दीपाचा पुढचा प्रवास नेमका कसा असणार याचीही उत्सुकता असेल. ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका प्रसारित होते सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता स्टार प्रवाहवर.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.