ETV Bharat / sitara

राजकुमार रावने तरुणाईला दिला खास संदेश, पाहा व्हिडिओ - election commission of india

राजकुमारने ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. मतदानाचा दिवस हा असा असतो, ज्यावेळी मतदार हा सर्वात शक्तीशाली असतो. मतदान कोणाला द्यावे, हा पूर्ण अधिकार मतदाराचा असतो. त्यामुळे आपले एक मत देशाचे भविष्य कसे ठरवू शकते, हे त्याने या व्हिडिओत सांगितले आहे.

राजकुमार राव
author img

By

Published : Mar 10, 2019, 8:11 PM IST

मुंबई - बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच चाहत्यांवर आपली छाप पाडणारा अभिनेता म्हणजे राजकुमार राव. राजकुमारने आत्तापर्यंत वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट साकारले आहेत. त्याच्या चित्रपटातून त्याने त्याच्या दमदार अभिनयाची झलक दाखवून दिली आहे. तरुणाईमध्ये राजकुमारची विशेष क्रेझ पाहायला मिळते. त्यामुळे राजकुमार रावने एक व्हिडिओ शेअर करुन तरुणाईला खास संदेश दिला आहे.
आज भारतीय निवडणूक समीतीने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहिर केल्या आहेत. ११ एप्रिलपासून निवडणुकीला सुरुवात होणार आहे. तर २३ एप्रिलला त्याचा निर्णय लागेल. त्यामुळे तरुणाईमध्ये मतदानाचे महत्व पटवून देणारा संदेश राजकुमार रावने दिला आहे.

राजकुमारने ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. मतदानाचा दिवस हा असा असतो, ज्यावेळी मतदार हा सर्वात शक्तीशाली असतो. मतदान कोणाला द्यावे, हा पूर्ण अधिकार मतदाराचा असतो. त्यामुळे आपले एक मत देशाचे भविष्य कसे ठरवू शकते, हे त्याने या व्हिडिओत सांगितले आहे.

'जर कोणाला वाटत असेल, की आपल्या एका मताने काही बदल होणार नाही, किंवा काही फरक पडणार नाही, तर हा विचार चुकीचा आहे. प्रत्येक मत महत्वाचे असते. आपल्या मतांवरच देशाचे भवितव्य अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे', असेही तो या व्हिडिओत म्हणताना दिसतो.

Intro:Body:

राजकुमार रावने तरुणाईला दिला खास संदेश, पाहा व्हिडिओ

मुंबई - बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच चाहत्यांवर आपली छाप पाडणारा अभिनेता म्हणजे राजकुमार राव. राजकुमारने आत्तापर्यंत वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट साकारले आहेत. चित्रपटातून त्याने त्याच्या दमदार अभिनयाची झलक दाखवून दिली आहे. तरुणाईमध्ये राजकुमारची विशेष क्रेझ पाहायला मिळते. त्यामुळे राजकुमार रावने एक व्हिडिओ शेअर करुन तरुणाईला खास संदेश दिला आहे.

आज भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. ११ एप्रिलपासून निवडणुकीला सुरुवात होणार आहे. तर २३ एप्रिलला त्याचा निर्णय लागेल. त्यामुळे तरुणाईमध्ये मतदानाचे महत्व पटवून देणारा संदेश राजकुमार रावने दिला आहे.

राजकुमारने ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. मतदानाचा दिवस हा असा असतो, ज्यावेळी मतदार हा सर्वात शक्तीशाली असतो. मतदान कोणाला द्यावे, हा पूर्ण अधिकार मतदाराचा असतो. त्यामुळे आपले एक मत देशाचे भविष्य कसे ठरवू शकते, हे त्याने या व्हिडिओत सांगितले आहे.

'जर कोणाला वाटत असेल की, आपल्या एका मताने काही बदल होणार नाही, किंवा काही फरक पडणार नाही, तर हा विचार चुकीचा आहे. प्रत्येक मत महत्त्वाचे असते. आपल्या मतांवरच देशाचे भवितव्य अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे', असेही तो या व्हिडिओत म्हणताना दिसतो.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.