मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राने सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. विवाहित पुरुषावर विनोद करीत मनी हिस्ट या लोकप्रिय वेब सीरिजला पंजाबी ट्विस्ट दिला आहे. व्हिडिओमध्ये त्याने स्वतःला नेटफ्लिक्सच्या सुपरहिट नाट्यातील द प्रोफेसर आणि शिल्पाला टोकियो म्हटले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
राज यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर फेस अॅप अॅपच्या सहाय्याने बनवलेला एक आनंददायक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना राजने लिहिले, "शेवटी मनी हिस्ट मधील एक पंजाबी जोडपे !! त्याने पंजाबी संवादचे भाषांतर केले- भारतीय महिलेचे मंगळसूत्र पाहून ती विवाहित आहे हे ओळखता येते तर मग विहाहित पुरुष कसा ओळतात हे माहिती आहे? तो - त्या पुरुषांच्या चेहऱ्यावरील दुःख पाहून😂😂😂."
प्लॅटफॉर्मवर १ लाख फॉलोअर्स असलेल्या कुंद्राने व्हिडिओसाठी १०९ के पेक्षा जास्त व्यूव्ह्ज मिळविली आहेत. राज यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त करताना शिल्पाने आपल्या कॉमेंट सेक्शनमध्ये म्हटलंय, "हे भगवान! @ राजकुंद्रा 😂😂😂😂".
शिल्पा शेट्टीसह बी प्राक, सारा खान आणि विकास भल्ला यासारख्या सेलिब्रिटींनाही राजचा मनी हिस्ट व्हिडिओ मजेदार वाटला आहे.
हेही वाचा -'स्कॅम १९९२' स्टार प्रतीक गांधीसोबत चित्रपटात रोमान्स करणार विद्या बालन