ETV Bharat / sitara

अखेर राहुल वैद्य चढला दिशासोबत बोहल्यावर - राहुल वैद्य विवाह

राहुल आणि दिशा आज विवाह बंधनात अडकले आहेत. दोघांच्या लग्नाची खूप दिवसापासून सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू होती. आजपासून दोघांच्या प्रेमाचा नवा अध्याय सुरू होईल.

Rahul Vaidya and Disha Parmar
राहुल आणि दिशा
author img

By

Published : Jul 16, 2021, 4:05 PM IST

मुंबई - बिग बॉस मुळे अल्पावधीतच प्रसिध्द झालेला गायक राहुल वैद्य (Rahul vaidya) आणि त्याची प्रेयसी दिशा परमार (Disha parmar) आज लग्नबंधनात अडकले आहेत. अनेक दिवसांपासून सिनेवर्तुळात याचीच चर्चा आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून राहुल चाहत्यांना लग्नाच्या विधी बाबत व्हिडिओ आणि फोटोच्या माध्यमातून सतत माहिती देत आला आहे.

ग्रँड हयातमध्ये रंगला विवाहसोहळा

राहुलच्या मित्रांनी लग्नविधीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हा विवाह सोहळा मुंबईच्या ग्रँड हयातमध्ये पार पडला. यावेळी राहुलने हस्त दंती रंगाचा शेरवानी परिधान केला होता तर दिशा वधूच्या लाल रंगाच्या वेशात खूपच सुंदर दिसत होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित हा लग्नसोहळा पार पडला.

राष्ट्रीय टीव्ही चॅनलवर राहुलने दिशाला केले होते प्रपोज

बुधवारी राहुल आणि दिशाचा मेहंदी कार्यक्रम पार पडला. गुरुवारी हळदीचा कार्यक्रम रंगला होता. राहुल आणि दिशा काही काळापासून रिलेशनमध्ये आहेत. बिग बॉस 14 मध्ये सर्वात पहिल्यांदा राहुलने दिशाबद्दलची आपली भावना व्यक्त केली होती. त्याने राष्ट्रीय टीव्ही वाहिनीवर दिशाला प्रपोज केले होते. यावर दिशा परमारने देखील तिचा होकार दिला होता. राहुलने दिशाच्या वाढदिवसाच्या दिवशी एका पांढऱ्या रंगाच्या टीशर्टवर लिपस्टिकने ‘माझ्याशी लग्न करशील का’ असं लिहित टेलिव्हिजनवरून प्रपोज केलं होतं. त्यानंतर व्हॅलेंटाइन्स डेला शोमध्ये येऊन दिशाने राहुलच्या प्रपोजला होकार दिला होता.

हेही वाचा - ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं निधन; बालिका वधू मालिकेतील 'कल्याणी देवी' भूमिका गाजली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.