ठाणे : फॉरएव्हर स्टार इंडियाने जयपूर येथे चार दिवसिय ब्यूटी पेजेंट, फॅशन वीक अवॉर्ड शो फॉरएव्हर मिस अँड मिसेज इंडिया 2021 चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकाच मंचावर तब्बल 300 मॉडेल्सनी क्राऊंनिंग केले. या स्पर्धेत राधिका राणे हिने डोंबिवलीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवत मिस ठाणे 2021 (सिटी विनर) हा किताब पटकावला.
डिजायनर ड्रेसमध्ये भन्नाट रॅम्पवॉक
राजधानी जयपूर येथील टोक रोड येथील हॉटेल मॅरियंटमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मराठमोळ्या राधिका राणे हिने डिजायनर ड्रेसमध्ये रॅम्पवॉक करून उपस्थित सर्वांच्या नजरा स्वतःकडे खिळवून ठेवल्या होत्या. फॉरएव्हर मिस अँड मिसेस इंडिया 2021 या स्पर्धेसाठी वेगवेगळ्या शहरांतून आलेल्या सिटी विनर्सची क्राऊनिंग सेरेमनी करण्यात आली. यावेळी या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी देशाच्या विविध राज्यांतून आलेल्या विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. फॉरएव्हर रियल सुपर हिरोज् व रियल सुपर वूमन अवॉर्ड सेरेमनीच्या शेवटच्या दिवशी फॉरएव्हर स्टार इंडियाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आहेत कार्यक्रमात 70 पेक्षा अधिक गटांतून 250 स्पर्धकांना सन्मानित करण्यात आले.
309 पेक्षा अधिक पहिल्यांदाच एका मंचावर क्राऊंनिग
विशेष म्हणजे 309 पेक्षा अधिक मॉडल्सची पहिल्यांदाच एका मंचावर क्राऊंनिग करण्यात आली. तसेच 250 स्पर्धकांना यावेळी सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत सहभागी मॉडेल्सची क्राऊनिंग 3 गटांत करण्यात आली. ज्यामध्ये सिटी, स्टेट आणि नॅशनल अशा विजेत्या स्पर्धकांचा समावेश करण्यात आला होता, असेही आयोजक राजेश अग्रवाल यांनी सांगितले.
250 स्पर्धकांचा गौरव ..
या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी बिजनेसमैन, एंटरपरेन्योर, स्पोर्टस, एज्युकेशन, मेडिकल, फॅशन, ब्यूटी, वेलनेस, आर्ट, कल्चर, सोशल वर्क,लिटरेचर यासारख्या सत्तरहून अधिक गटांतील 250 स्पर्धकांना प्रशस्तीपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आल्याची माहिती या स्पर्धेचे आयोजक राजेश अग्रलवाल यांनी दिली.
हेही वाचा - Javed Akhtar Defamation Case : कंगना रणौतला अंधेरी कोर्टाचा मोठा दिलासा