ETV Bharat / sitara

पुण्याच्या डिलीव्हरी बॉयची केबीसीपर्यंत मजल, अमिताभने विचारला 25 लाखाचा प्रश्न आणि... - Aakash Waghmare on KBC

कोरोनाच्या काळात भाड्याचेही घर सोडावे लागलेल्या आई वडिलांचा मुलगा आकाश वाघमारे. आज तो जिथे राहतो तिथे लाईट, पाणी अशाप्राथमिक सुविधाही त्याच्या कुटुंबाला मिळत नाहीत. मात्र आपल्या बुध्दीमत्तेच्या जोरावर तो थेट कौन बनेगा करोड पतीच्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्या समोर जाऊन बसला. 12 प्रश्नांची अचूक उत्तरे त्याने दिली आणि 25 लाखाच्या तेराव्या प्रश्नाला तो सामोरे गेला. जाणून घेऊयात त्याचा हा अद्भूत प्रवास...

पुण्याच्या डिलीव्हरी बॉयची केबीसीपर्यंत मजल

author img

By

Published : Sep 18, 2021, 10:42 PM IST

Updated : Sep 19, 2021, 10:01 PM IST

पुणे - छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कौन बनेगा करोडपती या रिऍलिटीशोच्या 13 व्या पर्वात पुण्यात डिलिव्हरी बॉयचं काम करणाऱ्या आकाश वाघमारे या तरुणाने सहभाग घेतला. त्याने 12 प्रश्नांची उत्तरे बरोबर दिल्यानंतर 13 वा प्रश्न त्याला 25 लाखाचा विचारण्यात आला. त्याने त्याच उत्तर चुकीचं दिल्याने त्याला शोमधून बाहेर पडावे लागले. पण त्या प्रश्नाच्या वेळेस त्याला आठवत होतं ते त्याचं घर..अनेक वेळा बिग बी अमिताभ बच्चन यांनी क्विट करणार आहेस का असं विचारलं असतानाही आकाशने पुढे खेळण्याचा निर्णय घेतला...त्याने हा निर्णय का घेतला याबद्दल अधिक जाणून घेऊयात...

पुण्याच्या डिलीव्हरी बॉयची केबीसीपर्यंत मजल

10 वर्षापासून केबीसीत जाण्यासाठी आकाश करतोय प्रयत्न

एमएम पर्यंत शिक्षण घेतलेला आकाश हा सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. त्याचं बरोबर तो स्विगीत फूडडिलीव्हरीचं काम देखील करत आहे. आकाश हा पुण्यातील कोथरूड येथील भेलकेनगर येथे गेल्या 1 वर्षापासून एका पत्राच्या शेडमध्ये राहत आहे. आकाशचे आई - वडील हे मूळचे बीड येथील असून ते गेली 13 वर्षांपासून पुण्यात राहत आहेत. वडील सेक्युरिटी गार्ड आणि आई धुनीभांडी करण्याचं काम करत असतात. पण ज्या ठिकाणी ते भाड्याने राहत होते तेथे लॉकडाऊनच्या काळात काही कारणामुळे त्यांना घर सोडणं भाग पडलं.

आत्ता ज्या ठिकाणी आकाश राहत आहे त्या ठिकाणी ना लाईट, ना पाणी...दिवस कसा तरी निघून जातो पण रात्र आकाश आणि त्याच्या आई वडिलांना अंधारातच काढावी लागते. या अंधारातून आपल्या आई वडिलांना बाहेर काढण्यासाठी आकाश गेल्या 10 वर्षापासून केबीसीमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी अभ्यासही करत आहे.

10 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर तो केबीसीच्या सेटवर पोहोचला आणि 3 लाख 20 हजार रुपयांचा मानकरी ठरला. आता त्याला एमपीएससीची परीक्षा पास होऊन घरच्यांसाठी एक चांगल घर घ्यायचं आहे, असे तो म्हणाला.

आकाशचे आई वडील
आकाशचे आई वडील

हेही वाचा - सोनू सूदच्या विरोधात 20 कोटी कर चोरीचे प्रकरण आले समोर

क्विट न करता खेळला प्रश्न

अमिताभ बच्चन यांच्यासोबत हॉट सीटवर बसलेल्या आकाश वाघमारे याने 12 प्रश्नांची उत्तरे दिले. तेरावा प्रश्न त्याला 25 लाखासाठी विचारण्यात आला. "अंतरिक्ष यान होप मंगल की कक्षा में प्रवेश करने वाला मध्य पुर्व का पहला खोजी मिशन बन गया, होप किस देश का अंतरिक्ष मिशन है" असा हा प्रश्न होता आणि त्याला पर्याय दिले होते...इराण, सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात, कतार. यातील सौदी अरब हगा पर्याय त्याने निवडला. मात्र हा हा पर्याय चुकीचा होता आणि 25 लाखावरुन त्याला थेट 3 लाख 20 हजारावर समाधान मानावे लागले.

आकाशचे आई वडील
आकाशचे आई वडील

बिग बीने दिली आकाशला अनोखी भेट

शो सुरू होण्याआधी डिलिव्हरी बाय असणाऱ्या आकाशला अमिताभ यांनी एक खास भेट दिली. कार्यक्रमाला सुरुवात होताना आकाशने आपण परिधान केलेला तपकिरी रंगाचा सदरा हा आईच्या आवडीचा असल्याचं अमिताभ यांना सांगितले. अमिताभ यांनी छान आहे सदरा असं म्हणत प्रेक्षकांना आकाश डिलीवरी बॉय असल्याची आठवण करून दिली.

अमिताभच्या भेटीने आकाश भारावला
अमिताभच्या भेटीने आकाश भारावला

त्यानंतर पुढे बोलताना अमिताभ यांनी किती विरोधाभास आहे पहा, की अनेकांना त्याच्या आवडीचे पदार्थ घरपोच देणाऱ्या आकाशला स्वतःला मात्र त्याच्या आवडीचा पदार्थ मागवता येत नाही. त्याचे स्वप्न आहे की कधीतरी त्याने ऑर्डर केलेला त्याचा आवडीचा पदार्थ म्हणजेच बिर्याणी घेऊन एखादा डिलिव्हरी बॉय यावा, आज आम्ही त्याची इच्छा पूर्ण करणार आहोत, असं म्हटलं आणि त्यानंतर अमिताभ यांनी एक पार्सल आकाशच्या हातात दिले. मीच तुमचा तो डिलिव्हरी बॉय असून ही घ्या बिर्याणी असं म्हणत आकाशला सरप्राईज दिलं. अमिताभ बच्चन यांच्यासारख्या बड्या कलाकारांनी दिलेली अनोखी भेट पाहून आकाश आणि त्याचे आई इंदुबाई वाघमारे आणि वडील रावसाहेब वाघमारे भारावून गेले.

हेही वाचा - शिल्पा शेट्टीने केली 'नव्या शेवटा'ची सुरुवात, सोशल मीडियावर शेअर केली गूढ पोस्ट

Last Updated : Sep 19, 2021, 10:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.