मुंबईः प्रियंका चोप्रा जोनासने सासू डेनिस जोनास यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोमवारी तिचा नवरा संगीतकार निक जोनासची आई 54 वर्षांची झाली तेव्हा. प्रियंकाने इन्स्टाग्रामवर एक सुंदर संदेश देत 'ममा जोनास' यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
डेनिस जोनास यांचा खास दिवस म्हणून सेलिब्रिटी जोडप्याने सोशल मीडियावर तिच्यासोबतचे फोटो पोस्ट केले आहेत आणि वाढदिवसाच्या मेसेजेस असलेल्या पोस्टमधून कौतुक केले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
प्रियंकाचा पती निक जोनासने आईला शुभेच्छा देणारी पोस्ट लिहिली आहे.
प्रियंकानेही स्वतंत्र पोस्ट लिहून सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. आपण एकत्रपणे वाढदिवस साजरा करु शकलो याबद्दल सुदैवी असल्याचे प्रियंकाने म्हटलंय.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
प्रियंका सध्या तिचा गायक पती निक जोनाससोबत अमेरिकेत राहत आहे.
हेही वाचा- अभिषेक बच्चनचा 'ब्रिथ' मालिकेतला सहकारी अमित साधची कोरोना चाचणी आली निगेटिव्ह
कामाच्या पातळीवर प्रियंका द व्हाईट टायगरमध्ये दिसणार आहे, ती आगामी नेटफ्लिक्स वरील चित्रपटामध्ये आदर्श गौरव आणि राजकुमार राव यांच्यासोबत झळकणार आहे. हा चित्रपट अरविंद अडीगाच्या त्याच नावाच्या मॅन बुकर पुरस्कारप्राप्त कादंबरीवर आधारित असून इरानी चित्रपट निर्माते रामिन बहराणी दिग्दर्शित आहे.
ग्लोबल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म अॅमेझॉनबरोबर तिने दोन वर्षांच्या मल्टी मिलियन डॉलर टेलिव्हिजन करारावरही स्वाक्षरी केली आहे.