ETV Bharat / sitara

कल्याणमध्ये नाट्यरसिक उत्तम, रस्ते मात्र थर्ड क्लास; प्रशांत दामलेंची टीका

कल्याणात नाट्यरसिक उत्तम आहेत, मात्र येथील "रस्ते थर्ड क्लास" असल्याची पोस्ट दामले यांनी फेसबुकवर अपलोड करत शासकीय यंत्रणेवर आगपाखड केली. रविवारी कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात प्रशांत दामले साखर खाल्लेला माणूस या नाटकाच्या प्रयोगासाठी आले होते.

प्रशांत दामले
author img

By

Published : Sep 16, 2019, 12:07 PM IST

Updated : Sep 16, 2019, 1:09 PM IST

ठाणे - पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी डोंबिवलीतील रस्त्यांचा उद्धार करून अवघे काही दिवसच उलटले नाहीत. अशात आता प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनीही कल्याण डोंबिवली शहरातील रस्त्याच्या दुरावस्थेवरून शाल जोडीतील टीका केली आहे.

कल्याणात नाट्यरसिक उत्तम आहेत, मात्र येथील "रस्ते थर्ड क्लास" असल्याची पोस्ट त्यांनी फेसबुकवर अपलोड करत शासकीय यंत्रणेवर आगपाखड केली. रविवारी कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात प्रशांत दामले साखर खाल्लेला माणूस या नाटकाच्या प्रयोगासाठी आले होते. मात्र कल्याणमधील रस्त्यांने त्यांची अशी काही अवस्था केली, की त्यांना रस्त्याच्या दुरवस्थेबाबत आपल्या भावना व्यक्त कराव्या लागल्या.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

आधी पंडित हृदयनाथ आणि आता प्रशांत दामले यांनी लाखो कल्याण डोंबिवलीकरांना रोज भोगाव्या लागणाऱ्या रस्त्यातील खड्ड्यांच्या समस्यांना वाचा फोडली आहे. अशात आता झाला तेवढ्या अपमानातून कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासन बोध घेत रस्त्यांची डागडुजी करणार, की आणखी कोणा नटसम्राटाकडून अपमानित झाल्यावरच पालिका प्रशासनाला जाग येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Intro:kit 319

Body:कल्याणात नाट्यरसिक उत्तम ; रस्ते मात्र थर्ड क्लास प्रशांत दामले यांची टीका

ठाणे : पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी डोंबिवलीतील रस्त्यांचा उद्धार करून अवघे काही दिवसच2 उलटले नाहीत, तोच आता प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनीही कल्याण डोंबिवली शहरातील रस्त्याच्या दुरावस्था वरून शाल जोडीतील टीका केली आहे,
कल्याणात नाट्यरसिक उत्तम आहेत मात्र कल्याणातील "रस्ते थर्ड क्लास " असल्याची पोस्ट फेसबुक वर अपलोड करीत प्रशांत दामले यांनी शासकीय यंत्रणा वर आगपाखड केली.

रविवारी कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात प्रशांत दामले साखर खाल्लेला माणूस या नाटकाच्या प्रयोगासाठी आले होते, मात्र कल्याणातील रस्त्यामुळे त्यांची अशी काही अवस्था केली की त्यांना रस्त्याच्या दुरवस्थेबाबत आपल्या भावना व्यक्त कराव्या लागल्या,
आधी पंडित हृदयनाथ आणि आता प्रशांत दामले यांनी लाखो कल्याण डोंबिवलीकरांना रोज भोगाव्या लागणाऱ्या रस्त्यातील खड्ड्यांच्या समस्यांना पुन्हा एकदा वाचा फोडली आहे,

झाल्या तेवढ्या अपमानातून तरीही कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासन बोध घेत रस्त्यांची डागडुजी करणार की आता आणखी कोणत्या नटसम्राट कडून अपमानित झाल्यानंतरच या पालिका प्रशासनाला जाग येणार त्या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळेल,

सर, फोटो , आणि दामले यांची पोस्ट डेक्स व्हॉट्सपवर टाकली

Conclusion:
Last Updated : Sep 16, 2019, 1:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.