ETV Bharat / sitara

साधू संत तपासणार स्क्रिप्ट, मगच मिळेल 'मध्य प्रदेश'मध्ये शूटिंगला परवानगी - प्रज्ञा ठाकूर - आश्रम 3 च्या सेटवर झालेल्या तोडफोडीचे प्रज्ञा ठाकूरने केले समर्थन

आश्रम -3 वेब सिरीजच्या शूटिंगच्या वादावर खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी निवेदन दिले आहे. साध्वींनी इशारा दिला की आश्रम वेब सीरिज मध्यप्रदेशात कुठेही चित्रीत होऊ दिली जाणार नाही. यासंदर्भात त्या मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी चर्चा करणार आहेत.

प्रज्ञा ठाकूर
प्रज्ञा ठाकूर
author img

By

Published : Oct 25, 2021, 10:20 PM IST

भोपाळ - भोपाळच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आश्रम 3 या वेब सिरीजच्या शूटिंगबाबत वादग्रस्त विधान केले आहे. आश्रम वेब सिरीजचे शूटिंग मध्य प्रदेशात कुठेही होणार नाही, असा इशारा प्रज्ञा सिंह यांनी दिला आहे. यासंदर्भात त्या मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी चर्चा करणार आहेत.

साधू संतांची कमिटी पाहणार स्क्रिप्ट - प्रज्ञा ठाकूर

सनातन धर्माचा अपमान करणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही, असा इशारा साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी दिला आहे. यापुढे अशा शूटिंगपूर्वी त्याची स्क्रिप्ट साधू संतांची कमिटी साधू संतांची कमिटी पहिल्यांदा वाचेल आणि योग्य असेल तर परवानगी दिली जाईल असेही प्रज्ञा ठाकूर यांनी महटलंय.

आश्रम 3 च्या सेटवर झालेल्या तोडफोडीचे प्रज्ञा ठाकूरने केले समर्थन

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तोडफोडीचे समर्थन खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले आहे. त्या म्हणाल्या, "ज्या प्रकारे आश्रमाचे नाव बदनाम केले जात आहे, त्यामुळे कार्यकर्ते आणि भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. भाजपचे लोक गुंड नाहीत. हे लोक देशासाठी जगतात आणि देशासाठी मरतात."

हेही वाचा - मी आणि माझा नवरा समीर जन्मतः हिंदू, क्रांती रेडकरचे नवाब मलिकांना प्रत्यूत्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.