ETV Bharat / sitara

‘देवमाणूस’ मालिकेत कोणाला पाहून अजितकुमारची हरपली शुद्ध? आणि का?

लोकप्रिय मालिका 'देवमाणूस' सध्या प्रचंड चर्चेत आहे. वास्तविक जीवनात काय घडले हे माहित असूनही मालिकेत काय घडणार याची प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता असते.‘देवमाणूस’ ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे.

author img

By

Published : Jul 15, 2021, 10:51 PM IST

‘देवमाणूस’
‘देवमाणूस’

सत्य घटनेवर आधारित झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'देवमाणूस' सध्या प्रचंड चर्चेत आहे. वास्तविक जीवनात काय घडले हे माहित असूनही मालिकेत काय घडणार याची प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता असते. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या वृत्तीविषयी भाष्य करणारी ‘देवमाणूस’ ही मालिका झी मराठीवर आली, आणि अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. सध्या मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं की किती चतुराईने अजितकुमार त्याच्यावर लावलेले सर्व आरोप खोटे ठरवतो. कोर्टात आर्या या निष्णात वकिलाविरुद्ध अजितकुमार आपली बाजू अत्यंत निर्भीडपणे मांडतो आणि आपण देवीसिंग नसून डॉक्टर अजितकुमार देव आहोत हे सगळ्यांना पटवून देतो.

popular series 'Devmanus'
‘देवमाणूस’

‘देवमाणूस’ ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे. एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. त्यामुळेच जेव्हा ठोस पुराव्यांअभावी कोर्ट देखील अजितकुमारची सुटका करणार असते त्यावेळी कथेत एक ट्विस्ट येणार आहे. मालिकेत एका नवीन व्यक्तिरेखेची एंट्री होणार आहे. चंदा ही व्यक्तिरेखा लवकरच मालिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. ही भूमिका अभिनेत्री माधुरी पवार निभावणार आहे. टीव्हीवर अजितकुमारची निर्दोष सुटका होणार हे ऐकून चंदा गोंधळात पडते. पण याच चंदाचा चेहरा पाहून कोर्टात अजितकुमारची शुद्ध हरपते.

या भूमिकेविषयी बोलताना माधुरी म्हणाली, "देवमाणूस ही मालिका अत्यंत रंजक वळणावर आली असून अशा वेळी या लोकप्रिय मालिकेत माझी चंदा या व्यक्तिरेखेतून एंट्री होणार आहे म्हणून खूप जास्त उत्सुक आहे. चंदा आणि देवीसिंग हे एकमेकांना ओळखतात पण ते एकमेकांना कसे ओळखतात आणि त्यांचा काय संबंध आहे हे प्रेक्षकांना लवकरच कळेल. चंदा ही एका वेगळ्या शैलीची व्यक्तिरेखा आहे आणि ही भूमिका निभावताना मला थोडंसं दडपण होतं पण संपूर्ण टीमने मला सांभाळून घेतलं. माझ्या आधी साकारलेल्या भूमिकेइतकंच प्रेक्षक या भूमिकेवर देखील प्रेम करतील ही मला खात्री आहे."

ही चंदा नक्की आहे तरी कोण? हिचा आणि देवीसिंगचा काय संबंध आहे? असे प्रश्न प्रेक्षकांना पडले तर नवल नाही. या प्रश्नांची उत्तरे ‘देवमाणूस’ मालिकेच्या पुढील भागांतून मिळणार आहेत. सत्य घटनेवर आधारित ‘देवमाणूस’ ही मालिका प्रसारित होते सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वा. झी मराठीवर.

हेही वाचा - आमिर-किरणचा संसार'मुक्त' डान्स, 'लाल सिंग चढ्ढा'च्या सेटवरील व्हिडिओ व्हायरल

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.