बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कॅप्टन्सी टास्क मध्ये स्नेहा वाघ आणि तृप्ती देसाई यांना कॅप्टन पदाचे दोन उमेदवार घोषित करण्यात आलंय. घरामध्ये जरी दोन स्ट्रॉंग गृप असले तरीदेखील गृपमधील सदस्यांमध्ये तितकासा एकेमकांबद्दल विश्वास दिसून येत नाही. मीरा आणि गायत्रीच्या संभाषणावरून हे कुठतेरी स्पष्ट झाले. तर विकास आणि विशालमधील वाद बघता दिवसेंदिवस अधिकच वाढत चालला आहे.
विशाल विकासला म्हणाला, ‘दोन तोंडाचा वापर नको रे, एक ठाम मत दे.’ त्यावर विकास म्हणाला, ‘दोन नाही दहा तोंड आहेत मला... मी रावण आहे.’ विशाल म्हणाला, ‘रावणाचा शेवटी अंत झाला हे लक्षात ठेव.’ विकास म्हणाला, ‘ठीक आहे चालेल, अंत प्रत्येकाचा आहे, अमर कोणी नाहीये इथे सगळे मारायला आले आहेत. मरेन पण दहा तोंड असलेला रावण म्हणून मरेन, तुझ्यासारखा सामान्य माणूस म्हणून मरणार नाही.’ विशाल म्हणाला, “मी सामान्य माणूस आहे आणि मी खुश आहे....”
स्नेहाचं म्हणणं आहे की मीरा आणि गायत्रीने परत तेच केलं जे त्यांनी सुरेखाताईंच्या वेळेला झाला होतं. तर मी तिला तेच म्हटलं की बिग बॉस सगळ्यांना समान संधी देतात. वेट फॉर यूर टर्न. आज जर तू कॅप्टन झालीस तर मग सहा ते सात दिवस बॉल इज इन यूर कोर्ट.” उत्कर्षचे त्यावर म्हणणे आहे “मला काय पटतं सांगू का मी स्पर्धक म्हणून सांगतो, “Play like a player”.
आता सदस्यांना पुन्हा एकदा मिळणार संधी शक्तीपदक पटकविण्याची. बिग बॉस यांनी घरामध्ये जाहिर केले, “जे दोन सदस्य सर्वात आधी बिग बॉसने सांगितलेल्या रूममध्ये पोहचतील ते शक्तीपदक मिळविण्यासाठीचे उमेदवार ठरतील. आणि ती रूम आहे कन्फेशन रूम...”
गायत्री मीराशी बोलताना म्हणाली, “मी फक्त दाखवेन माझा सपोर्ट आहे पण मी नाही करणार. ते आपला फायदा घेतात आपण त्यांचा घ्यायचा. त्यांच्यासमोर प्रतिक्रिया नको देऊस. बेडवर आपणचं असू तेव्हाचं बोलायचं, दुपारी चहा पिताना, प्रत्येक गोष्टीत आपण एकत्र असतो.”
बिग बॉस मराठी सिझन तिसरा कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होतो.
हेही वाचा - Aryan Khan Released : अखेर 26 दिवसांनंंतर आर्यन खान ऑर्थररोड तुरुंगातून बाहेर