मुंबई - बॉलिवूडचे सुप्रसिद्ध कोरियोग्राफर आणि अजय देवगनचे वडील वीरू देवगन यांच्या निधनाने कलाक्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनी अजय देवगनच्या कुटुंबाला भेट घेतली. अशात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील वीरू देवगन यांना आदरांजली वाहिली आहे. तसेच, त्यांनी एका पत्राद्वारे अजय देवगनच्या आईला वीना देवगन यांना सांत्वना दिली आहे.
'कलाविश्वात वीरू देवगन यांची पोकळी कधीही भरुन न निघण्यासारखी आहे. त्यांचे चित्रपटसृष्टीतील योगदान फार मोठे आहे. कोणतेही तंत्रज्ञान उपलब्ध नसताना त्यांनी स्टंट साकारण्याचे प्रयोग केले. चित्रपट सृष्टीसाठी ते एक प्रेरणादायी व्यक्ती होते. त्यांना माझी भावपूर्ण आदरांजली', असे त्यांनी या पत्रात लिहिले आहे. पंतप्रधान मोदी यांनी २८ तारखेला हे पत्र लिहिले होते.
![PM Narendra Modi Writes Note on Veeru Devgan demise](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3455283_letter.jpg)
नरेंद्र मोदींच्या या पत्रामुळे अजय देवगनही भावुक झाला होता. त्याने सोशल मीडियावरून त्यांचे आभारही व्यक्त केले आहेत. 'माझी आई आणि संपूर्ण कुटुंब तुम्ही दिलेल्या या सांत्वनासाठी तुमचे मनापासून आभारी आहोत', असे त्याने त्याच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.