मुंबई - अभिनेत्री-दिग्दर्शिका दिव्या खोसला कुमार ही बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झालेला टीव्ही अभिनेता पर्ल व्ही पुरीच्या समर्थनार्थ पुढे आली आहे. अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी पर्ल याला यात कशा प्रकारे अडकवले आहे याची गोष्ट तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितली आहे.
एकता कपूर, अनिता हसनंदानी, निया शर्मा आणि इतर सेलिब्रिटींच्यानंतर आता दिव्यानेही पर्लला पाठिंबा दर्शविला आहे. सोमवारी, दिव्याने इंस्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट लिहून पर्लचे समर्थन केले आहे. अल्पवयीन मुलीचे आई वडील मुलीची कस्टडी मिळवण्यासाठी भांडत असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
याबाबत काही स्फोटक खुलासे करीत दिव्याने म्हटले आहे की मुलीचे वडील आपल्या मुलीचा ताबा मिळविण्यासाठी या प्रकरणात पर्लला अडकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. एकता कपूर निर्मित शो 'बेपनाह प्यार' च्या सेटवर ही घटना घडली. वैयक्तिक फायदा घेण्याच्या हेतुने #MeToo सारख्या महत्त्वपूर्ण चळवळीचा कसा दुरुपयोग केला जात आहे याविषयी तिने पोस्टमध्ये म्हटलंय.
दिव्याने पर्लबरोबर म्यूझिक व्हिडिओ 'तेरी आंखों में' काम केले आहे. आपल्या पोस्टमध्ये तिने मुलीविषयी चिंता व्यक्त केली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, "ती मुलगी आपल्याच वडिलासोबत मानसिकदृष्ठ्या खेळत आहे.'' या आरोपांमुळे पर्ल स्वच्छा असतानादेखील त्याच्या करियारला धक्का बसू शकतो असेही दिव्याने म्हटलंय.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
पर्लने २०१३ मध्ये 'दिल की नजर से खुबसुरत' या शोमधून अभिनेता म्हणून सुरुवात केली होती. एकता कपूरच्या 'नागिन ३' आणि 'बेपनाह प्यार' या मालिकांमुळे त्याला खूप लोकप्रियता मिळाली. 'ब्रह्मराक्षस 2' या मालिकेमध्ये तो शेवटचा दिसला होता.
पर्ल पुरी याला २०१९ मध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली ४ जून रोजी अटक केली होती. पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तो १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे.
हेही वाचा - नागीन फेम अभिनेता पर्ल पुरीला अटक, १७ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याबाबत कारवाई