मुंबई, - सनी लिओनीने ख्रिसमसच्या दिवशी आपल्या चाहत्यांना आणि अनुयायांना शुभेच्छा दिल्या असून या साथीच्या काळात द्वेषाच्या जागी प्रेम पसरवण्यास सांगितले आहे.
अभिनेत्रीने सनी लिओनी म्हणाली की, "मला माझ्या चाहत्यांना आणि अनुयायांना ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यावयाच्या आहेत. या सणासुदीच्या काळात सुरक्षित राहा, प्रेमाचा प्रसार करा. कारण आम्ही अशा काळात जगत आहोत जिथे तिरस्कारापेक्षा प्रेमाची जास्त गरज आहे.''
मुंबईत जूपी मूव्हीज क्विझ अॅपच्या लॉन्चवेळी सनी बोलत होती.
अभिनयाबद्दल बोलायचे तर तर सनी 'गुन-फू' या अॅक्शन मालिकेत दिसणार आहे. विक्रम भट्ट यांनी दिग्दर्शित केलेली आणि लिहिलेली ही मालिका त्यांनी स्वत: आपली मुलगी कृष्णा भट्ट हिच्यासह तयार केली आहे. ही मालिका एमएक्स प्लेयरवर रिलीज होणार आहे.
हेही वाचा - केरळमधील २१ वर्षांची आर्या राजेंद्रन भारतातील सर्वात तरुण महापौर