डिस्कव्हरी चॅनेलवर 'मॅन व्हर्सेस वाईल्ड' 'या शोमध्ये यावेळी बेयर ग्रिल्ससोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसणार आहेत. येत्या १२ ऑगस्टला हा शो रात्री ९ वाजता प्रसारित होईल. उत्तराखंडातील प्रसिध्द जिम कार्बेट नॅशनल पार्कमध्ये मोदी अॅडव्हेन्चर करताना दिसणर आहेत. मॅन व्हर्सेस वाईल्ड'मध्ये सहभागी होणारे नरेंद्र मोदी काही पहिले व्यक्ती नाहीत. यापूर्वी अनेक दिग्गजांनी या शोमध्ये अॅडव्हेन्चरचा अनुभव बेयर ग्रिल्स याच्यासोबत घेतलाय. यात प्रियंका चोप्राचा पती निक जोनासचाही समावेश होतो.
'मॅन व्हर्सेस वाईल्ड'च्या तिसऱ्या सिझनमध्ये निक जोनासने बेयर ग्रिल्ससोबत अॅडव्हेन्चर केले होते. अमेरिकेच्या सिएरा नेवादा अभयारण्यात निकने हा अफाट अनुभव घेतला होता. निक शिवाय अमेरिकन निर्माती आणि अभिनेत्री जूलिया रॉबर्ट्स हिने २०१७ मध्ये बेयर ग्रिल्ससोबत अॅडव्हेन्चर केले होते. यावेळी जूलिया केन्या हीदेखील सहभागी झाली होती.
अमेरिकन अभिनेता आणि मॉडेल स्कॉट ईस्टवुड मॅन व्हर्सेस वाईल्डच्या चौथ्या सीझनमध्ये आला होता. 'फ्लॅग्स ऑफ ऑर फादर' चित्रपटाचा नायक असलेल्या स्कॉटने बेयर ग्रिल्ससोबत बाल्कन पेनिनसुला या घनदाट जंगलात भटकला होता. आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मॅन व्हर्सेस वाईल्डमध्ये झळकतील. पाच भाषामध्ये (इंग्लिश, बंगाली, हिंदी, तामिळ आणि तेलुगु ) हा कार्यक्रम डिस्कव्हरी नेटवर्कवर जगभरातील १८० देशात दाखवला जाईल.